AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरू असून रोहित शर्माच्या बातम्यांना पेव फुटलं आहे. ही मालिका त्याच्या क्रिकेटची शेवट असणार असल्याचं बोललं जात आहे. असं असताना या मालिकेतून यशस्वी जयस्वालला वगळून खेळी केल्याचा दावा केला जात आहे.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?
Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?Image Credit source: PTI
| Updated on: Jul 17, 2026 | 7:17 PM
Share

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून फक्त वनडे सामने खेळत आहे. असं असताना त्याच्या वनडे कारकि‍र्दीला वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्यापूर्वीच पूर्णविराम लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना त्याच्या कारकि‍र्दीचा शेवट असणार आहे, असं बोललं जात आहे. असं असताना एक वेगळीच बातमी समोर आली आहे. रोहित शर्माची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड केली जाणार नव्हती. पण असं असूनही त्याची निवड केली गेली आणि यशस्वी जयस्वालला जाणीवपूर्वक बाहेर ठेवलं गेलं. खरं तर या वनडे मालिकेत यशस्वी जयस्वालला संधी देण्याची योजना निवडकर्त्यांनी आखली होती, पण शेवटच्या क्षणी रोहित शर्माला संधी दिली गेली. यातून यशस्वी जयस्वालची संघात निवड केली नाही असा संदेश अप्रत्यक्षरित्या रोहित शर्माला दिला गेला.

यशस्वी जयस्वालला बाहेर करण्याचं कारण काय?

भारतीय संघाच्या निवड समितीने यशस्वी जयस्वालला संघातून डावललं आणि रोहित शर्माला अप्रत्यक्षरित्या एक संदेश दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याच्यामुळे एका युवा खेळाडूला संघातून वगळल्याचं दाखवलं गेलं. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालला निवड समिती जास्तीत जास्त संधी देण्याच्या प्रयत्नात असल्याचाही दावा केला जात आहे. यशस्वी जयस्वाल एक चांगला खेळाडू आहे, यात काही दुमत नाही. त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण दुर्दैवाने फक्त कसोटी फॉर्मेट खेळत आहे. यशस्वी जयस्वाल टी20 आणि वनडे संघातील रेग्युलर खेळाडू नाही.

रोहित शर्माच्या तुलनेत यशस्वी जयस्वाल उजवा

रोहित शर्माच्या उतरत्या क्रिकेट कारकि‍र्दीत यशस्वी जयस्वाल त्याच्यापेक्षा चांगला पर्याय ठरत आहे. यशस्वी जयस्वाने 29 कसोटी सामन्यात 48.75 च्या सरासरीने 2535 धावा केल्या आहेत. यात 7 शतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्येही सहा सामन्यात त्याने दोन शतकं ठोकली आहेत. वनडे त्याची सरासरी 70 पेक्षा अधिक आहे. तर 22 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36पेक्षा जास्त सरासरीने 723 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकं ठोकली आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 160 पेक्षा अधिक आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...