AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

Iran US conflict : अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत, याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणने अमेरिकेची अनेक लढाऊ विमाने उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा
Iran vs usa ConflictImage Credit source: Google
| Updated on: Jul 17, 2026 | 6:52 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सतत वाढत चालला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत, याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणने अमेरिकेची अनेक लढाऊ विमाने उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, जॉर्डनमध्ये तैनात असलेल्या अनेक अमेरिकी लष्करी फायटर जेट्सना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. तर दुसरीकडे जॉर्डनच्या लष्कराने तीन इराणी क्षेपणास्त्रे हवेतच पाडल्याचा दावा केला आहे.

इराणच्या हल्ल्यात अनेक लष्करी विमाने नष्ट

अनेरिकन फायटर जेटवर हल्ला करण्याचा दावा करताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, या हल्ल्यात अमेरिकेची अनेक इंधन भरणारी विमाने आणि फायटर जेट्स नष्ट करण्यात आली असून आणखी काहींना मोठे नुकसान झाले आहे. तसेच इराणी सैनिकांच्या हत्येचा बदला म्हणून सीरियातील अल-तनफ येथील अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांड सेंटरवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा IRGC ने केला आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

अमेरिकेचे मोठे नुकसान

IRGC च्या एरोस्पेस फोर्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, जॉर्डनमधील अमेरिकी लढाऊ विमानांवरील हा हल्ला ‘ऑपरेशन नस्र-2’च्या 14 व्या टप्प्याअंतर्गत दोन फेऱ्यांमध्ये करण्यात आला. या कारवाईत अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेची अनेक टँकर विमाने आणि फायटर जेट्स नष्ट झाले असून काहींना गंभीर नुकसान झाल्याचे IRGC ने म्हटले आहे.

अमेरिकेने इराणमधील पुल उडवले

अमेरिकेने शुक्रवारी सकाळी इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवत अनेक पूल, ऊर्जा प्रकल्प आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणमधील एका महत्त्वाच्या बंदरावरील मनोरा उद्ध्वस्त झाल्याचेही समोर आले आहे. इराणच्या होर्मोजगान प्रांतातील बंदर खमीर परिसरातील दोन पुलांवर झालेल्या अमेरिकी हवाई हल्ल्यांमध्ये सात नागरिकांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. आता आगामी काळात दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...