AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना जबर फटका; एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, मुंबई हादरली!

मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड केबलच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. यामुळे गाड्या १-२ तास उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या या गोंधळात भांडूप येथे एका तरुणाचा, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना जबर फटका; एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, मुंबई हादरली!
| Updated on: Oct 26, 2026 | 10:25 PM
Share

मुंबईकरांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीचा प्रचंड सोमवार त्रासदायक ठरला. मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळपासूनच प्रवाशांचे हाल झाले. मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमधून तारा लटकलेल्या आढळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी, अनेक लोकल गाड्या तब्बल एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. या खोळंब्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सोमवारी मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर घडलेल्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भांडुप स्थानकात एसी लोकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान अन्य दोघांचे मृतदेह आढळले. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

भांडुप येथे एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ येथे ही दुर्दैवी घटना घडली. साहिल थिटे असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना साहिलला एसी लोकलची धडक बसली. मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घाटकोपर-विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा मृत्यू

दरम्यान, घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान आणखी दोन मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलं. सुरुवातीला रेल्वे पोलिसांना घटनास्थळी एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर आणखी एक मृतदेह आढळल्याचं समोर आलं. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पुढील तपासातून आणखी स्पष्ट माहिती समोर येऊ शकते.

दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने सोमवारी अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाला. मुलुंड आणि नाहूर दरम्यान काही प्रवासी रेल्वे रुळांवरून चालत असल्याचेही दिसून आले. लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली होती. एकंदरच मुंबईकरांचा  आजचा दिवस मनस्तापाचा गेला.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी