Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबईत आज समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)ने किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

आज समुद्रात सुमारे 4.49 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीदरम्यान समुद्र अधिक खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत जोरदार वारे वाहत असून, समुद्राच्या उंच लाटांचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक मरीन ड्राइव्हसह विविध समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले आहेत.
कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देत पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक ती काळजी घेण्याचे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Jul 17, 2026 03:48 PM
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक