AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

| Updated on: Jul 17, 2026 | 1:39 PM
Share

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात घडला असून, भरधाव पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात घडला असून, भरधाव पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात मुर्शिदाबादमधील बहरमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडला. सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेली खासगी शाळेची व्हॅन रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना निमतिता–काटोया पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ती रुळांवरून दूर फेकली गेली. अपघातावेळी व्हॅनमध्ये चालकासह आठ जण होते. या भीषण दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगच्या एका बाजूचे फाटक बंद होते, मात्र दुसऱ्या बाजूचे फाटक उघडेच असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, क्रॉसिंगवरील गेटमनने वेळेत फाटक बंद न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कर्णसुबर्ण ब्लॉक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published on: Jul 17, 2026 01:39 PM

Follow Us
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल.

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला.

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

प्रत्येक विवाहित महिलेच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे 14 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, 99 टक्के पुरुषांना माहितीच नाही.

प्रत्येक विवाहित महिलेच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे 14 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, 99 टक्के पुरुषांना माहितीच नाही