AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट

Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट

| Updated on: Jul 17, 2026 | 4:30 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतरवर पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या आंदोलनाला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, अनेक नेत्यांनीही उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या सकाळी दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी क्रांतिकारी जनशक्ती पक्षाचे नेते अभिजित दीपकेही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असून, त्यांचे वजन सुमारे ८ ते ९ किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, केंद्र सरकारवरही विरोधकांकडून टीका होत आहे.

याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती. त्यामुळे या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 17, 2026 04:30 PM

Follow Us
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा.

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?.

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडे मॅच खेळलाही नाही तरीही हर्षित राणा कसा ठरला व्हिलन? मोठं कारण समोर.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडे मॅच खेळलाही नाही तरीही हर्षित राणा कसा ठरला व्हिलन? मोठं कारण समोर