AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पितृदोष आहे? मग दररोज करा हा सोपा उपाय, झटक्यात होईल दूर

हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तेव्हा अशा लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. ज्या घरात पितृदोष आहे, अशा घरात कधीही पैसा टिकत नाही, तसेच महत्त्वाच्या कामात देखील अडथळे निर्माण होतात. आज आपण पितृदोष दूर करण्याचा एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात पितृदोष आहे? मग दररोज करा हा सोपा उपाय, झटक्यात होईल दूर
pitru doshaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 7:41 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपल्या एखाद्या पूर्वजांचा मृत्यू होतो, आणि त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहते, तेव्हा घरात पितृदोष निर्माण होतो. एखाद्याच्या घरात पितृदोष निर्माण झाल्यास तो दूर करण्यासाठी विविध उपाय करतो. परंतु पितृदोष दूर करून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. जेव्हा एखाद्याच्या घरात पितृदोष निर्माण होतो, तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, जसं की तुम्ही प्रगती करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. परंतु जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो पैसा कधीही तुमच्या हातात टिकणार नाही, जसा पैसा येईल तसा तो कोणत्या न कोणत्या मार्गाने खर्च होत राहील, एवढंच नाही तर तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये देखील अडथळे येतात. तसेच कुटुंब प्रमुखाला किंवा घरातील इतर सदस्यांना आरोग्याच्या समस्या देखील जाणवू शकतात, त्यामुळे पितृदोष दूर करणं गरजेचं असतं.

पितृदोष नेमका कशामुळे निर्माण होतो? जर मृत्यूपूर्वी तुमच्या एखाद्या पूर्वजाची इच्छा अपूर्ण असेल तर पितृदोष निर्माण होतो. तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांची आठवणं म्हणून त्यांचं श्राद्ध, पक्ष करणं गरजेचं असतं. परंतु अनेकदा आपणं यापैकी एकही करत नाहीत, त्यामुळे देखील घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पितृदोष निर्माण होऊ नये, पूर्वज आपल्यावर नाराज होऊ नये, यासाठी दर वर्षी आठवणीने आपल्या पूर्वजांची आठवणं म्हणून श्राद्ध आणि पक्ष दोन्हीही केले पाहिजेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पितृदोष निवारणासाठीचा उपाय – हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. गायीमध्ये देवतांचा निवास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे ज्या लोकांना पितृदोष आहे, अशा लोकांनी दररोज सकाळी पहिली पोळी ही गो मातेला खाऊ घालावी आणि त्यानंतरच जेवण करावं. गो मातेला गवत खाऊ घातलं तरी चालेल, मात्र त्यानंतरच तु्म्ही भोजन करावं, त्यापूर्वी करू नये. हा उपाय दररोज न चुकता सकाळी करावा, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात. तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात, आणि तुमच्या पाठिमागचे सर्व कष्ट दूर होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक