SC on Shiv Sena Party and Symbol Hearing LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी, शिंदे गट मांडणार बाजू..
Supreme Court on Shiv Sena Party and Symbol Hearing Case LIVE Updates in Marathi : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे दिल्लीतच आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावातील शाहूनगर परिसरातील चोरीची घटना उघडकी
पोलिसांकडून तिघांना अटक १२ हजारांची रोकड हस्तगत. दूध विक्रेत्याच्या पँटच्या खिशातील १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी केली होती लंपास. जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा गुन्हे शोध पथकाकडून उलगडा.शहिदखान नजीरखान आणि समीर खान मजीदखान यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला अटक
-
MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात नंदुरबारमधून आणखी एका आरोपीवर गुन्हा दाखल..
ऋतुजा पाटील हिचा नातेवाईक असलेल्या मयूर ठाकरे याच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल…. पेपरफुटी प्रकरणात मयूर ठाकरे याचाही सहभाग असल्याचा मुंबई पोलिसांना संशय….प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांना पेपरफुटीसाठी मयूर ठाकरे याने मदत केल्याचा पोलिसांचा संशय…. मयूर ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नंदुरबारमधून फरार असल्याची माहिती….यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटील, अमृत पाटील, गौरव पाटील आणि MPSC कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाल मराठे हे आरोपी असून नंदुरबारशी निगडित आहेत….
-
-
एमआयडीसीत गौरी, गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग
कारखान्यातील केमिकल आणि रंगाच्या ज्वलनशील डब्यांमुळे आग झपाट्याने पसरली, ज्यामुळे लाखोंच्या गणेशमूर्ती जळून खाक झाल्या. वाई नगरपालिकेसह परिसरातील अग्निशामक बंबानी सुमारे ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. गणेशोत्सव तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेत मोठी आर्थिक हानी झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असून नेमकी ही आग कोणत्या कारणातून लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
-
राहुल गांधींच्या दौऱ्याचा शहरात एकही बॅनर नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी आणि होर्डिंगला पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे. शहरात राहुल गांधींच्या दौऱ्याचे एकही बॅनर किंवा होर्डिंग लावण्यात आलेले नाही. अगदी काँग्रेस कार्यालयाबाहेरही राहुल गांधींचे बॅनर झळकलेले नाही.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आज होणार आहे. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीतच आहेत. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी आहे. आज शिंदेंच्या शिवसेनेकडून कोर्टात युक्तीवाद केला जाणार आहे. ठाकरे गटाचे युक्तीवाद संपला. त्यानंतर शिंदेंच्या युक्तीवादाला सुरूवात होईल. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. आम्हाला चिन्ह देता आले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, असे शिवसेना ठाकरे गटाने मागच्या युक्तीवादात मागणी केली. त्यासोबतच शिवसेना ठाकरेंचीच असल्याचा दावा केला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या मुद्द्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत. दिल्लीत ते मुक्कामी आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. इतरही महत्वाच्या अपडेटसाठी tv9 चा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Sep 02,2026 8:23 AM
