चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,एक जण ठार तर तीन जण जखमी,आजूबाजूच्या इमारतीच्या काचा तुटल्या
चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीतील केमिकल टँकरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजुबाजूच्या इमारतीची तावदाने फुटली.

चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीतील केमिकल टँकरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि वेल्डिंग करणारा कामगार जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या स्फोटाने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या अपघातात एक जण ठार आणि दोन जण जखमी झाले आहेत.
चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीत एका टँकरचे वेल्डिंगचे काम सुरु असताना त्याची गॅसचा मोठा ब्लास्ट झाल्याची घटना घडली. हा ब्लास्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे येथील नागरिकांत प्रचंड घबराट पसरली. या घटनेत टँकरचा चालक आणि वेल्डींग करणारा कर्मचारी अक्षरश: काही फूट उडाले.
या घटनेत चालक आणि वेल्डर गंभीर जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर एकाला तपासून मृत घोषीत करण्यात आले आहे. या स्फोटाने या परिसरातील काही काळ घबराट पसरली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. या घटनेतील जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी धारावी येथे गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने सिलिंडरचा ब्लास्ट होऊन मोठी दुर्घटना घडली होती.
मुंबईत अपघाताच्या मालिका सुरुच
त्यामुळे या भागात रात्री ज्वालांचे लोट उटले होते. मुंबई गेले काही दिवस अपघातांच्या मालिका घडत आहेत. चेंबुर येथे झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा चेंबूर येथे मृत्यू झाला होता. तर घाटकोपर साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका पादचाराचा मृत्यू झाल्याची घटनाही अतिवृष्टीच्या दिवशी घडली होती. तर त्याच काळात मुंब्रा येथे शॉक लागून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. आता चेंबुर येथेच जिजामाता नगरात टँकरचा स्फोट झाल्याने प्राण हानी झाली आहे.
