IND vs NZ : ‘मी कोणाला चुकीचं सिद्ध करायचं आहे हे..’ न्यूझीलंड विरुद्ध विजयाचा हिरो संजू सॅमसनने मॅचनंतर मनातलं सांगून टाकलं
IND vs NZ 1st T20i :टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. आज पहिल्या सामन्यात टीम इंडियाने रोम हर्षक विजय मिळवला. ओपनर संजू सॅमसन या विजयाचा नायक ठरला.

टीम इंडियाने आज न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही देशांमध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मॅचमध्ये ओपनर संजू सॅमसन चमकला. तो किती मोठा खेळाडू आहे ते सॅमसनने पुन्हा एकदा सिद्ध केलं. संजूने 33 चेंडूत 67 धावा फटकावल्या. त्या बळावर टीम इंडियाने सर्वात मोठा रेकॉर्ड चेज केलं. न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 226 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. टीम इंडियाने 2 चेंडू राखून विजय मिळवला. या रेकॉर्डतोड विजयात संजू सॅमसनने एक खास वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. संजू सॅमसन टी20 मध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सर्वात जास्त फिफ्टी प्लस बनवणारा विकेटकिपर बनला आहे. त्याने 7 वेळा 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फिफ्टी प्लस धावा केल्या. जॉस बटलरने 6 वेळा ही कमाल केलीय. डिकॉक 4, शे होप 3 आणि फिल सॉल्टने तीनवेळा हा कारनामा केलाय.
संजू सॅमसनने प्लयेर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतर सिक्रेट ओपन केलं. “विकेटकिपर म्हणून खूप मदत मिळते. पीच कसा आहे ते समजतं. क्राइस्टचर्चमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये पीच पूर्णपणे बदलेला. विकेटकिपिंग करताना मी हा विचार करतो की, या पीचवर मला कशी बॅटिंग करायची आहे. मी इथे फलंदाजीसाठी उतरलो, त्यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पहिल्या इनिंगमध्ये चेंडू थोडा थांबून येत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने बॅटवर येत होता. हे सर्व दवामुळे झालं. मी बॅटिंगचा आनंद घेतला” असं संजू सॅमसन सामना संपल्यानंतर म्हणाला.
भारतासाठी खेळणं सोपं नाहीय
संजू सॅमसन म्हणाला की, “लोक सोशल मीडियावर काय बोलतात त्याने फरक पडत नाही. मी कोणाला चुकीच सिद्ध करण्यासाठी खेळत नाहीय” “लोक काय बोलतात याची मी फिकिर करत नाही. भारतासाठी खेळणं सोपं नाहीय. खूप आवाज असतो. प्रत्येकाचं आपलं एक मत असतं. लोक सोशल मीडियावर काय बोलतात यावर मी लक्ष देत नाही. मी माझ्या प्रोसेसवर विश्वास ठेवतो. आपल्या सरावाचा आदर करतो. क्रिकेट खेळण्यावर लक्ष देतो. मी कोणाला चुकीचं सिद्ध करायचं आहे हे डोक्यात ठेवून खेळत नाही” असं संजू सॅमसन म्हणाला.
