AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

Kalyan Lawyer Case : कल्याण कोर्टातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वकिलाने आपल्या महिला सहकाऱ्यांचे फोटो आणि डेटा चोरल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच... महिला वकिलांकडून बेदम मारहाण
Kalyan CourtImage Credit source: Google
| Updated on: Jul 17, 2026 | 9:00 PM
Share

गेल्या काही काळापासून मोबाईचा गैरवापर वाढला आहे. अनेक लोकांचा डेटा चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याचा अनेकदा गैरवापरही केला जातो. अशातच आता कल्याण कोर्टातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वकिलाने आपल्या महिला सहकाऱ्यांचे फोटो आणि डेटा चोरल्याचे समोर आले आहे. आयफोन मधील एअर ड्रॉप या ॲपद्वारे वकिलाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही काळापासून वकील महेश जाधव यांच्याकडून हा प्रकार सुरू होता. आज एका महिला वकिलाने त्याला रंगेहात पकडले आणि चोपल्याचे समोर आले आहे. यामुळे कल्याण कोर्टाच्या परिसरात मोठा राडा झाला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

10-15 महिला वकिलाचा डेटा चोरला

समोर आलेल्या माहितीनुसार, महेश जाधव या वकिलाने आयफोनमधील एअरड्रॉप द्वारे सहकारी महिला वकिलांचे फोटो आणि त्यांचा डेटा चोरला. एक दोन नव्हे तर तब्बल 10 ते 15 महिला वकिलांच्या मोबाईलमधून त्यांचे वैयक्तिक फोटो आणि डेटा आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर केले. मात्र काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आल्यानंतर महिला वकील संतापल्या आणि त्यांनी या वकिलाचा शोध सुरू केला.

आज वकील महेश जाधव कल्याण कोर्ट परिसरात आला असता त्याला काही महिला वकिलांनी पकडले आणि सर्वांसमोर चोप दिला. गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे कोर्टाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वकिलाला चोपल्यानंतर महिला वकिलांनी महेश जाधव याला महात्मा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याच समोर आले आहे. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून डेटा चोरला

दरम्यान, सध्या पोलिसांकडून महेश जाधव याने या फोटोंचा आणि डेटाचा नेमका काय गैरवापर केला याची चौकशी सुरू आहे. तसेच महेश जाधवने हा डेटा नेमका का चोरला होता? याआधीही अशा प्रकारचा डेटा चोरण्याचा प्रकार झाला आहे का? याही प्रश्नांनी उत्तरे पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?