AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसकट मराठा आरक्षणाला माझा विरोध, जरांगे यांचे उपोषण सुरू असतानाच नारायण राणेंची मोठी भूमिका; म्हणाले सरकारने परवानगी…

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली असून ते भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपोषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरसकट मराठा आरक्षणाला माझा विरोध, जरांगे यांचे उपोषण सुरू असतानाच नारायण राणेंची मोठी भूमिका; म्हणाले सरकारने परवानगी...
manoj jarange patil and narayan raneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2026 | 8:01 PM
Share

Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली असून ते भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपोषणावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपोषण करण्यास परवानगी द्यायला नको होती

मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला  बसलेले असताना त्याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मनोज जरांगे हे भर उन्हात उपोषणाला बसले आहेत, असे सांगितले जात आहे. त्यांनी भर उन्हात उपोषण करायला नको होते. सरकारनेही त्यांना भर उन्हात उपोषण करण्यास परवानगी द्यायला नको होती, असे स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी भर उन्हात आंदोलन करायचं मग नेत्यांनी जाऊन त्यांना भेटायचं हे व्हायला नको. त्यांना काही झालं तर त्यास सरकार जबाबदार असणार आहे, असेही पुढे नारायण राणे म्हणाले.

मराठ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करतं

पुढे बोलताना, जरांगे यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही सरसकट आरक्षण मागू नये. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. हा फरक आजचा नाहीये. मराठ्यांना कुणबी करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, याला माझा विरोध आहे. जरांगे यांनी जो सरसकट शब्द काढून टाकावा. कुणब्यांना कुणबी समाजाचं आरक्षण द्यावं. त्यावर माझं काहीही म्हणणं नाही, अशी थेट भूमिका नारायण राणे यांनी घेतली. मराठ्यांनाही कुणबी करावं, याला माझा विरोध आहे, असे म्हणत सरकारही मराठ्यांच्या प्रश्नांना नेहमी विलंब करतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केले. जो-तो श्रेय घेण्यासाठीच मनोज जरांगे यांना भेटत आहे. मराठे या राज्यात 32 टक्के आहेत. त्यांचा प्रश्न अगोदर हाताळला पाहिजे, अशी गरजही राणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, जरांगे उपोषणाला बसलेले असताना सरकार नेमका काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता