AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident: चढावर कार बंद पडली अन्… कार १५० फूट खोल दरीत कोसळली; तोरणा किल्ल्याच्या वाटेवर अनर्थ, घटनेनं खळबळ

Pabe Ghat Accident: पाबे घाटात पावसामुळे कार घसरत थेट १५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत.

Pune Accident: चढावर कार बंद पडली अन्... कार १५० फूट खोल दरीत कोसळली; तोरणा किल्ल्याच्या वाटेवर अनर्थ, घटनेनं खळबळ
| Updated on: Oct 31, 2026 | 8:41 PM
Share

पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य करत जखमींना वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला आहे. घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कारमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश हे आज पहाटे हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. कार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाऊस आणि रस्ता ओलसर असल्यामुळे कार घसरू लागली. काही क्षणांतच चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली.

अपघातानंतर मागून येणाऱ्या काही पर्यटकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत या पर्यटकांनी त्यांच्याकडील दोरीच्या मदतीने कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. सुरक्षित ठिकाणी आणले. त्यानंतर तानाजी भोसले, त्याने सपकाळ, संदीप सोळसकर आणि दिलीप तळेकर यांच्या रेस्क्यू टीमने मदतकार्य केले.

या अपघातातील तिघांना पुढील उपचारासाठी वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे शहरात पाठवण्यात आले. पावसाळी वातावरणात घाटरस्त्यांवर वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज या अपघातातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच, संकटाच्या वेळी मदतीला धावून आलेल्या पर्यटकांच्या तत्परतेचेही कौतुक होत आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट