AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ट्रकची जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला, दोघांचा मृत्यू

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड : केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली. या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं? केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात […]

VIDEO | ट्रकची जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला, दोघांचा मृत्यू
मुंबई-आग्रा हायवेवर नाशिकजवळ अपघात
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 25, 2021 | 8:27 AM
Share

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड : केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली. या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

वाहतूक 3 तास ठप्प

अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प झाली होती. अपघात स्थळापासून काही अंतरावर वाहतूक थांबवण्यात आली होती. टँकर मुंबई येथून केमिकल्स घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

पाहा व्हिडीओ :

बोरटेंभे ब्रिजजवळ आयशर-पिकअप अपघात

दोनच दिवसांपूर्वी, मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ भीषण अपघात झाला होता. आयशर आणि पिकअप गाडी धडकून तिघे जण जखमी झाले. अपघातात पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

नेमकं काय घडलं होतं?

पिकअप गाडी आयशर वाहनावर धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ हा अपघात झाला. दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. अपघातात पिकअप गाडीचा चुराडा झाला.

जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर

शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना रुट पेट्रोलिंग टीमने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | कारला धडकून बाईकसह तरुण गेला फरफटत, नाशकात भीषण अपघात, संतप्त जमावाने गाडी पेटवली

एक टन काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू, विचित्र अपघाताने कोल्हापुरात हळहळ

मुंबई नाशिक हायवेवर भीषण अपघात, आयशरवर धडकून पिकअप गाडीचा चक्काचूर

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...