AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यानं आधी रस्त्यावर भाईगिरी केली, नंतर पोलिसांनी त्याच ठिकाणी येऊन पोलीसगिरी दाखविली, व्हिडिओ व्हायरल

मद्यपी तरुणाकडून वाहनचालकांना शिवीगाळ करणे, धमकी देऊन पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता, त्रिमूर्ति चौकात हा सर्व प्रकार घडला असून याचे चित्रीकरण देखील नागरिकांनी केले होते.

त्यानं आधी रस्त्यावर भाईगिरी केली, नंतर पोलिसांनी त्याच ठिकाणी येऊन पोलीसगिरी दाखविली, व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 03, 2023 | 8:49 AM
Share

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरात दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यावरून पुणे पोलीसांच्या पाठोपाठ नाशिक पोलिसांचेही मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कोयता गॅंगच्या एकाला भर रस्त्यातच बेदम चोप दिल्याने पुणे पोलिसांचे जोरदार कौतुक केलं जात आहे. त्या पाठोपाठ नाशिक शहर पोलिसांचाही असाच व्हिडिओ समोर आला आहे. अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ नाशिक पोलिसांचे कौतुक करत आहे. अनेक नागरिकांनी पोलीसांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. यापूर्वीही नाशिकरोड भागात पोलीसांनी गुंडगिरी करणाऱ्या टोळीला बेदम चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला नाशिक पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

नाशिक शहरातील नवीन नाशिक परिसरातील त्रिमूर्ती चौकात 31 डिसेंबरला एका मद्यपीने धुडगूस घातला होता. आणि त्यानंतर त्याला पोलीसांनी दिलेला त्याला चोप असे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. मात्र, अंबड परीसरात पोलिसांचा बंदोबस्त नसल्याचे पाहून एका तरुणाने धिंगाणा घातला.

मद्यपी तरुणाकडून वाहनचालकांना शिवीगाळ करणे, धमकी देऊन पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता, त्रिमूर्ति चौकात हा सर्व प्रकार घडला असून याचे चित्रीकरण देखील नागरिकांनी केले होते.

याशिवाय आपल्याजवळ शस्त्र असल्याचा धाक दाखवत पादचारी तसेच वाहनचालकांकडून पैशाची मागणी तो करत होता. त्याच वेळी नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवली होती.

अंबड पोलीसांनी तात्काळ तरुणांचा शोध घेत दहशत माजवणाऱ्या भाई चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...