संपत्तीचा वाद टोकाला गेला, पुतण्याने काकाच्या तोंडात दारुगोळा कोंबला अन्…

मालमत्ता वादाचा बदला घेत पुतण्याने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जखमी काकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपत्तीचा वाद टोकाला गेला, पुतण्याने काकाच्या तोंडात दारुगोळा कोंबला अन्...
संपत्तीचा वाद टोकाला गेला अन्...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 9:37 PM

हरियाणा : मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये आता मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वात उत्तम परतावा देणारी गुंतवणूक म्हणून मालमत्तांकडे पाहिले जात आहे. मालमत्तांचा हा विषय सर्वांनाच जवळचा झाला आहे. या मालमत्तांच्या हक्कावरून गुन्हेगारीत वाढ होण्याचे प्रमाणही वाढले (Increase in crime rate) आहे. हरियाणामध्ये (Haryana) घडलेल्या अशाच एका घटनेत एका व्यक्तीला त्याच्या पुतण्याने जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुणाने काकाच्या तोंडामध्ये दारूगोळ्याने भरलेला पाईप टाकला आणि बॉम्ब फोडला.

मालमत्ता वादाचा बदला घेत पुतण्याने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जखमी काकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फटाक्यांच्या हादऱ्याने अत्यंत गंभीर दुखापत

पुतण्याने अन्य दोन आरोपींच्या साथीने घडवून आणलेला हल्ला अत्यंत भयानक होता. तोंडामध्ये फटाक्यांचा जबरदस्त हादरा बसल्यामुळे पीडित काकाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली आहे. त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी पुतण्याने मालमत्ता वादातून याआधी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, याचाही तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे. तसेच हत्तीचा प्रयत्न करण्याच्या कटात कुटुंबातील आणखी कोणी कोणी सहभागी आहे का, त्याचा देखील शोध घेतला जात आहे.

पीडितेच्या बहिणीकडून तक्रार दाखल

पीडित व्यक्तीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. सायबर सिटीच्या सोहना परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जखमी काकाला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक बनवल्याने सफदरजंग रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

आरोपी जितेंद्र व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी शोध मोहीम राबवून त्या परिसरांना घेरले आहे.

घराशेजारील शेतात घडली घटना

पीडित व्यक्ती दिवाळीच्या रात्री जवळच असलेल्या शेतामध्ये गेला होता. याची खबर लागताच आरोपी पुतण्याने अन्य दोन मित्रांना सोबत घेऊन शेत गाठले आणि काकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

काकाच्या तोंडामध्ये दारूगोळ्याने भरलेला पाईप टाकून बॉम्ब फोडण्यात आला. यादरम्यान आरोपीने आपल्या भावाच्या पोटात गोळी देखील मारली. बॉम्बचा स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक रहिवाशांनी तातडीने शेतात धाव घेतली. रहिवाशांना पाहून आरोपींनी तातडीने तेथून पळ काढला.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.