AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविद्यालयीन तरुणाईमध्ये कसली क्रेझ? पोलीसांच्या कारवाईने उडाली खळबळ, प्रकरण काय ?

नाशिक शहरातील तरुणाई सध्या नव्या संकटात सापडत आहे. नाशिकच्या कॉलेजरोड परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाई पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

महाविद्यालयीन तरुणाईमध्ये कसली क्रेझ? पोलीसांच्या कारवाईने उडाली खळबळ, प्रकरण काय ?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 08, 2023 | 5:50 PM
Share

नाशिक : सध्या व्हॅलेंटाईन वीक ( Velntine Week )सुरू आहे. याच काळात तरुणाईत विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ( College Student ) मोठा उत्साह असतो. प्रेम व्यक्त करण्याचा सुरू असलेल्या या प्रेमाच्या सप्ताहात नाशिक पोलीसांनी ( Nashik Police ) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाईमध्ये सध्या पोलीसांच्या याच कारवाईची जोरदार चर्चा आहे. पोलीसांच्या कारवाईनंतर नाशिक शहरातील तरुणाईमध्ये कसली क्रेझ आहे हे देखील समोर आले आहे.

नाशिक शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाईची चर्चा होत असतांना ई सिगारेटची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे. नाशिक शहर पोलीसांनी कारवाई 88 हजार रुपयांचे ई सिगारेट जप्त केले आहे.

नाशिक पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाला कॉलेजरोड परिसरात ई सिगारेटची मोठी चर्चा आहे अशी माहिती मिळाली होती. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने यामध्ये सापळा रचत ही कारवाई केली आहे.

शहरातील तरुणाईमध्ये आणि महाविद्यायच्या विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेट ओढण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. तरुण-तरुणी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत असल्याचे समोर आल्यानंतर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.

कॉलेजरोड परीसारत ई सिगारेट विक्री करणारे सर्वेश रामधनी पाल, फैसल अब्दुल शेख यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 निकोटिन युक्त ई सिगारेटच्या बॉक्स, 80 नग ई सिगारेट असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महाविद्यालयातील तरुण-तरुणी यांचा ई सिगारेट वापरण्याचे प्रमाण यावरून समोर येत आहे. कॉलेजरोड परिसरात असलेला तरुणाईचा वावर बघून ई सिगारेटची मोठी विक्री सुरू असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

नाशिक शहर पोलीसांनी या कारवाईवरच न थांबता याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात पुनः ई सिगारेटचा सुळसुळाट बघायला मिळेल. कॉलेजरोड परिसरात याबाबत तपासणी मोहीम राबविणे देखील गरजेचे आहे.

असं असतं ई सिगारेट – बाजारात मिळणाऱ्या सिगारेट पेक्षा ई सिगारेट काही वेगळे नाहीत. साध्या सिगारेटमध्ये तंबाखू सारखे पदार्थ असल्याने त्याचा धूर होतो. मात्र, ई सिगारेट मध्ये तंबाखू किंवा तसा पदार्थ नसतो. त्यामध्ये द्रव असते. त्याला लाईटर किंवा काडीपेटीची गरज नसते. त्यामध्ये बॅटरी असते, ज्यावेळी सिगारेट ओढली जाते त्यावेळी आपोआप पेट घेत असते. साध्या सिगारेट पेक्षा ई सिगारेटचा आकार मोठा असतो.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय