AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpari-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 21 वर्षांचा नराधम गजाआड

नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडिल मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून तरुण तिच्या घरात घुसला आणि तिचे लैंगिक शोधण केले. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Pimpari-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 21 वर्षांचा नराधम गजाआड
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 11:51 PM
Share

पुणे : एकीकडे अल्पवयीन मुली, महिलांविरुद्धची गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे कडक केले जात आहेत. महिलांसाठी स्वतंत्र कायदे केले जात आहेत. अशा परिस्थितीतही महिलांच्या सुरक्षेला धक्का देणार्‍या घटना काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुण्यातील एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका 13 वर्षांच्या मुलीचे तिच्या राहत्या घरीच 21 वर्षांच्या नराधम तरुणाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टाईम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे आई-वडिल मोलमजुरी करतात. नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडिल मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून तरुण तिच्या घरात घुसला आणि तिचे लैंगिक शोधण केले. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा पीडित मुलीवर डिसेंबरपासून अत्याचार करीत होता आणि धमकावत होता. पण तिने आता तिच्या आई-वडिलांसमोर घडला प्रकार कथन केला, असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले.

नांदेड आणि यवतमाळमध्येही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या दोन घटना आज नांदेड आणि यवतमाळमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका शाळकरी मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. यातून तरुणाने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले असता ही बाब उघडकीस आली. बदनामीच्या भितीने आई वडिलांनी मुलीला गर्भपात करण्यासाठी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दुसरीकडे, नांदेडमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घराच्या पाठिमागे नेऊन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आलेय. मुलगा आणि मुलगी दोघेही शेजारी राहतात. ऑनलाईन शिक्षणासाठी दोघे एकत्र येत असत. अत्याचारानंतर मुलीने त्रास होत असल्याचे सांगताच आई वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले तेव्हा ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (13-year-old girl tortured in Pimpri-Chinchwad; 21 year old accuse arrested)

इतर बातम्या

Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

Wardha : अवैध गर्भपात प्रकरणात आरोग्य संचालकांनी केली अभ्यासगटाची स्थापना, समितीला दहा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.