AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना डॉक्टर ना कुठली पदवी तरीही शरीरयष्टीसाठी इंजेक्शनचा डोस, पिंपरीत चौघांना अटक

मेफेन्टरमाइन सल्फेट हे इंजेक्शन हृद्यदाब वाढवण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही.

ना डॉक्टर ना कुठली पदवी तरीही शरीरयष्टीसाठी इंजेक्शनचा डोस, पिंपरीत चौघांना अटक
मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदा विक्री
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 18, 2021 | 2:19 PM
Share

पुणे : मेफेन्टरमाइन सल्फेट (Mephentermine Sulfate) या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या चौघा जणांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी चार जणांना जेरबंद केलं. त्याच्याकडून या इंजेक्शनच्या 211 बाटल्या आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 2 लाख 6 हजार 548 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

परेश रेणूसे, प्रविणसिंग भाटी, अक्षय वांजले, शौनक संकपाळ अशी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. रेणूसे हा जिम ट्रेनर म्हणून काम करतो. मेफेन्टरमाइन सल्फेट हे इंजेक्शन हृद्यदाब वाढवण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. असं असतानाही हे चौघे जण जिममध्ये येणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी वाढवण्यासाठी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत होते.

नागपुरात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार

दुसरीकडे, रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार (Remdesivir Injection Black Market) करणाऱ्या दोघा जणांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुभम अर्जुनवार, ज्योती उर्फ जिया उत्तमसिंग अजित असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काळाबाजार करताना दोघांना अटक करण्यात आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे ब्लॅकमार्केट केल्याचा आरोप झाला होता. हा प्रकार 18 एप्रिल 2012 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वाथोडा परिसरात घडला होता. 25 हजार रुपयांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकत असताना त्यांच्याकडून 5 इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. आजपर्यंत रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात ही तिसरी केस असून चार आरोपींना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नागपुरात वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

याआधी, नागपुरातील वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. एप्रिल 2021 मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरून विकल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता. 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याचे आदेश दिले होते. याचा तपास तीन महिन्यांत पूर्ण होऊन निकाल लागला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या समक्ष सुनावणी झाली होती.

संबंधित बातम्या :

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी 5 वर्षांचा कारावास, महाराष्ट्रातील कोर्टाचा सुपरफास्ट निकाल

रेमडेसिव्हीर काळा बाजार, सापळा रचून पकडलेल्या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...