पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण, फायनान्स कंपनी वसुली एजंटने मारल्याचा आरोप

बजाज फायनान्सच्या वसुली एजंटने मारहाण केल्याचा गंभीर आरोप रिक्षा चालकाने केला आहे. भर रस्त्यात मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर रिक्षा चालक काही काळ तसाच पडून होता

पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण, फायनान्स कंपनी वसुली एजंटने मारल्याचा आरोप
पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 06, 2021 | 10:12 AM

पुणे : बीएमडब्ल्यू कार चालकाने राष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात रिक्षा चालकालाही मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनीतर्फे आलेल्या व्यक्तींनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप रिक्षा चालकाने केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. बजाज फायनान्सच्या वसुली एजंटने मारहाण केल्याचा गंभीर आरोप रिक्षा चालकाने केला आहे. भर रस्त्यात मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर रिक्षा चालक काही काळ तसाच पडून होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महिला खेळाडूला भररस्त्यात मारहाण

राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला (Vaishnavi Thube) बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने (Sumeet Tilekar) हडपसर परिसरात जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुमित टिळेकरने दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

वैष्णवी ठुबे तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बीएमडब्ल्यू कार चालक सुमित टिळेकर वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगाने जात होता. सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या वैष्णवीच्या वहिनीच्या पायाला गाडीचा धक्का लागला. त्यावेळी वैष्णवीने सुमितला गाडी हळू चालवा, असा विनंतीवजा सल्ला दिला. आपल्याला कार हळू चालवण्यास सांगितल्याचा राग अनावर होऊन सुमित टिळेकरने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर हडपसर परिसरात फातिमानगर चौकात कार थांबवून त्याने लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये वैष्णवी ठुबेच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

संबंधित बातम्या :

कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग, पुण्यात BMW चालकाची 23 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला दांडक्याने मारहाण

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

Follow Us