कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग, पुण्यात BMW चालकाची 23 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला दांडक्याने मारहाण

दुचाकीला धक्का लागल्यामुळे गाडी नीट चालवण्यास सांगितल्याचा बीएमडब्लू कार चालकाला राग आला आणि त्याने तरुणीला भररस्त्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे

कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग, पुण्यात BMW चालकाची 23 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला दांडक्याने मारहाण
पुण्यात महिला खेळाडूला मारहाण

पुणे : बीएमडब्ल्यू कार चालकाने तरुणीला भर रस्त्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. जुडो रेसलिंग खेळणाऱ्या 23 वर्षीय वैष्णवी ठुबे या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला हडपसर परिसरात सुमित टिळेकर या बांधकाम व्यावसायिकाने जबर मारहाण केली. सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन वाद झाला. यावेळी बाईकला धक्का लागल्यामुळे वैष्णवीने कार चालक सुमितला गाडी नीट चालवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे चिडून त्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कार चालकासह गाडीतील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील फातिमानगर चौकात घडली. मारहाणीत वैष्णवी ठुबे हिचा हात फ्रॅक्चर झाला असूनही या प्रकारात वानवडी पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी या संदर्भात गंभीर मारहाणीचं कलम वाढवलं. त्यामुळे वानवडी पोलिसांच्या विरोधात वैष्णवी ठुबेने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचे 307 कलम लावावं, अशी मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वैष्णवी ठुबे तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी कार चालक सुमित टिळेकर वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगाने जात होता. त्यामुळे दुचाकीवर बसलेल्या वैष्णवीच्या वहिनीच्या पायाला धक्का लागला. त्यावेळी वैष्णवीने सुमितला गाडी हळू चालवा, असा विनंतीवजा सल्ला दिला.

आपल्याला कार हळू चालवण्यास सांगितल्याचा राग अनावर होऊन सुमित टिळेकरने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर फातिमानगर चौकात कार थांबवून लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये वैष्णवी ठुबेच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

पुण्यातील ‘ती’ मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI