पुण्यातील ‘ती’ मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा

रत्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर चक्क झोपून या तरुणीने नागरिकांना शिवीगाळ केली आहे. विशेष म्हणजे कारवाई करायला गेल्यानंतर तरुणी पोलिसांच्या हातावर तुरी देत गायब झाली आहे.

पुण्यातील 'ती' मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा
Pune-Girl-Drama-on-Road

पुणे : पुण्यातील एका मद्यधुंद तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. टिळक रोडवरील हिराबाग चौक परिसरात या मद्यधुंद तरुणींने चांगलाच धिंगाणा घातला. नुसताच धिंगाणा नाही तर, रत्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर चक्क झोपून या तरुणीने नागरिकांना शिवीगाळ केली आहे. विशेष म्हणजे कारवाई करायला गेल्यानंतर तरुणी पोलिसांच्या हातावर तुरी देत गायब झाली आहे. (Pune drunk girl used abusive abused word against citizens get escaped when police came)

पोलीस ठाण्यातील मार्शल तातडीने तिथे पोहचले

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील ही तरुणी प्रचंड दारू प्यायलेली होती. काळी जिन्स आणि लाल टॉप घातलेली ही तरुणी अगोदर रस्त्याच्या मधोमध उभी राहून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर ती रस्त्यावर बसली. तिच्या आजूबाजूने बस, कार जात होत्या. काही वेळाने तर ती चक्क रस्त्यावर झोपली. तिचे हे वागणे पाहून रस्त्यावर गर्दी जमली. त्यानंतर स्वारगेट व खडकी पोलीस ठाण्यातील मार्शल तातडीने तिथे पोहचले. पोलिसांनी तिला हटकले. त्यानंतर पोलिसांना घाबरून ही तरुणी चपापली आणि तेथून निघून गेली़.

नेमका प्रकार काय आहे ?

पुण्यातील हिराबाग चौकात हा प्रकार घडला. हा परिसरत तसा नेहमीच गजबजलेला असतो. येथे वाहनांची मोठी रेलचेल असते. मात्र, याच चौकात मंगळवारी (3 ऑगस्ट) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास एक विचित्र प्रकार समोर आला. येथे एक मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी रत्यावर धिंगाणा घालत होती. त्याच्या या धिंगाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाला होता. व्हिडीओ पाहून नेटकरी तसेच पुणेकर तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत होते.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, असा प्रकार पुणेकरांना नवीन नाही. मात्र यामुळे पुणेकर नागरिक आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तरुणांनी मौजमजा करताना थोडे सौजन्य राखणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनीसुद्धा अशा प्रकारांवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी पुणेकर करत आहेत.

इतर बातम्या :

तरुणाचे वर्तन संशयास्पद, पोलिसांनी हिसका दाखवताच पुण्यात तरुणाकडे पिस्तुल सापडले

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, चित्रा वाघ पोलिसांवर भडकल्या

दहावीचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक अश्लील व्हिडीओ स्क्रिनवर, शिक्षिकेसह विद्यार्थी बुचकळ्यात

(Pune drunk girl used abusive abused word against citizens get escaped when police came)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI