दहावीचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक अश्लील व्हिडीओ स्क्रिनवर, शिक्षिकेसह विद्यार्थी बुचकळ्यात

ऑनलाईन शिक्षक हे कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण खेड तालुक्यात एका इंग्रजी शाळेचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक स्क्रिनवर अश्लील व्हिडीओ सुरु झाला.

दहावीचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक अश्लील व्हिडीओ स्क्रिनवर, शिक्षिकेसह विद्यार्थी बुचकळ्यात
प्रातिनिधिक फोटो

पिंपरी चिंचवड (पुणे) : ऑनलाईन शिक्षक हे कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण खेड तालुक्यात एका इंग्रजी शाळेचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक स्क्रिनवर अश्लील व्हिडीओ सुरु झाला. त्यामुळे शिक्षिकेसह विद्यार्थ्यांनाही धक्का बसला आहे. स्क्रिनवर अचानक नेमकं काय सुरु झालं? आणि ते कसं सुरु झालं? असा प्रश्न सर्वांना पडला. विशेष म्हणजे नेमकं आता पुढे काय करावं हे देखील काही क्षणासाठी कुणाला समजत नव्हतं. या अश्लील व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल? असा प्रश्न आता शाळा प्रशासन आणि पालकांकडून उपस्थित केला जातोय. तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दहावीचा वर्ग सुरु असताना संबंधित प्रकार घडला

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील नामांकित इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये झूम ॲपद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. पण ऑनलाईन पद्धतीने शिक्षिका शिकवत असताना चक्क अ‍ॅपवरती अश्लिल चित्रफित सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही याचा धक्का बसला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवताना चक्क अश्लील चित्रफित आल्याने ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात झुम अ‍ॅपचा वापर केला जात आहे. पण या अ‍ॅपवर अशाप्रकारे अश्लील व्हिडीओ समोर येत असतील तर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण द्यावे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अ‍ॅप हॅक केल्याचा संशय

अ‍ॅप हॅक करुन हे कृत्य करण्यात आल्याचा अंदाज शिक्षकांनी वर्तवला आहे. यासंदर्भात शिक्षकांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. मात्र शिक्षणाचे धडे गिरवण्याच्या काळात जर विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावर अशा चित्रफितीने दुष्परिणाम होत असतील तर हे निश्चितच चुकीचं आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. असे दुष्कृत्य करणाऱ्या इसमांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI