CCTV : स्वतःच्या घरात स्वतःच्याच बायकोसोबत जेव्हा तिचा मित्र सापडतो तेव्हा…

नवरा, बायको, दहाव्या मजल्याची गॅलरी आणि बायकोच्या मित्रासोबतचा थरारक घटनाक्रम

CCTV : स्वतःच्या घरात स्वतःच्याच बायकोसोबत जेव्हा तिचा मित्र सापडतो तेव्हा...
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 3:31 PM

पिंपरी-चिंचवड : गावी जातो असं सांगून पिंपरी चिंचवडीमधील (Pimpri Chinchwad Crime News) एक पती घरातून गेला. पण पत्नीवर पाळत ठेवणं त्यानं सोडलं नव्हतं. अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. आपल्याच घरात आपल्या बायकोसोबत पतीने पत्नीला आणि तिच्या मित्राला रंगेहाथ पकडलं. यानंतर पतीने उचलेल्या पावलाने अख्खं पिंपरी चिंचवड शहर हादरलंय. राहत्या घराच्या दहाव्या मजल्यावरुन संतापलेल्या पतीने पत्नीच्या मित्राला (Husband Killed wife’s friend) ढकलून दिलं. या पत्नीच्या मित्राचा जागीच जीव गेला. या घटनेप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक (Pimpri Chinchwad Murder) केली असून आता पुढील तपास केला जातोय.

पंकज शिंदे हा पिंपरी चिंचवड शहरात आपल्या पत्नीसह राहत होता. त्याला पत्नीवर संशय होता. यासाठी त्याने एक शक्कल लढवली. गावी जातो आहे, असं सांगून पंकज शिंदे पत्नीवर पाळत ठेवत होता.

हे सुद्धा वाचा

पंकज पत्नीवर पाळत ठेवत असताना त्याच्या मनात जो संशय होता, तो खरा ठरला. पंकज गावी गेल्याचं समजून त्याचा बायकोचा मित्र तिला भेटायला घरी पोहोचला. बायकोच्या मित्राचं नाव निलेश अखोस जोर्वेकर असल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ :

निलेश आणि पंकजच्या पत्नीला आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. पंकजने निलेशसह त्याच्या बायकोला आपल्याच घरात जाताना पाहिलं आणि तो हादरला. संतापाच्या भरात निलेशने अचानक घरात धाड टाकली आणि दोघेही थबकले.

संतापलेल्या पंकजने निलेश याच्यावर धारदार शस्त्राने आधी वार केले आणि त्यानंतर दहाव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट त्याला खाली ढकलून दिलं. यात निलेशचा प्रचंड रक्तस्त्राव होऊन आणि जबर मार लागल्यानं जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच, पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला. तसंच निलेशची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती पंकज शिंदे यालाही बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.