AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका, जिथे कोयता मिरवला त्याच परिसरातून वरात

कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली.

VIDEO : पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका, जिथे कोयता मिरवला त्याच परिसरातून वरात
पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 15, 2021 | 8:13 PM
Share

पिंपरी चिंचवड (पुणे) : कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली आहे. आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली. या यम भाईने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं तो व्हिडीओत म्हणाला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

नेमकं प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर भाऊ, भाई, दादा अशा लोकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते. अनेक जण विविध प्रकारचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, त्यापैकी काही व्हिडीओ चांगल्या संदेशाचे असतात, तर काही समाजात भीती पसरविण्याचे काम देखील करत असतात. अशाच पद्धतीने समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील इन्स्टाग्रामवर कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या राकेश सरोदे उर्फ यम भाई या गावगुंडाला गुंडविरोधी पथकाने अटक केली.

तो स्वतःला कोयता भाई असल्याचं सांगतो

तो स्वतःला कोयता भाई म्हणून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारित करत होता. या कोयता भाईच्या हातात कोयता घेऊन प्रदर्शन करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडीओमध्ये कोयता हातात घेऊन दहशत पसरवण्यासाठी “आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात.” तसेच हातात कोयता घेत “वेळ आली की मी कोण आहे हे दुनियाला सांगायची आणि मी काय करू शकतो, असे म्हणून कोयता दाखवत या राकेश सरोदे ऊर्फ यम भाईने दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. याची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी या यम भाईला अटक करत त्याची मस्ती उतरवलीय.

एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये तीन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर असताना अशा प्रकारे घातक हत्यारांचा प्रदर्शन हे सोशल मीडियावरील भाई करत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण हे दूषित होत चालेल आहे. मात्र या सोशल मीडियावरील दहशत माजवणाऱ्या व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या भाई लोकांवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातमी :

सोशल मीडियावरील कोयता भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती