AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. कारवाई दरम्यान आरोपी व पोलीस यांच्यात चकमक उडाल्याची घटना घडली आहे. यात कोणती जीवित हानी झाली नाही. परंतु या कारवाईच्या पथकामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही उपस्थित असल्याची चर्चा रंगली आहे.

Pimpri Chinchwad crime | पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 27, 2021 | 12:26 PM
Share

पिंपरी – मागली दोन आठवडयापूर्वी सांगवी परिसरात घडलेल्या योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी गेलेलया पोलिस व आरोपींमध्ये चकमक घडली असून यात आरोपींनी केले तीन राउंड फायर केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या चकमकीत दरम्यान एक पोलीस कर्मचारी किरकोरळ जखमी झाला आहे.

अशी केली कारवाई

या गुन्हया  प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी चाकण मधील कुरवंडी गावात हे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आयुक्तालयातील चार पथकांनी तात्काळ हालचाली करत त्यांना पकडण्याची कारवाई केली. पोलीस पकडण्यासाठी गेले, असता मुख्य आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण आणि त्याचा साथीदारांनी पोलिसांवर केली फायरिंग सुरु केली. मात्र पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आले . यावेळी पोलिसांनी 4 पिस्तुल तीन जिवंत काडतुस आणि गुन्हात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी केली जप्त केले आहे.

कृष्णप्रकाश उपस्थित असल्याची चर्चा

हत्याप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. कारवाई दरम्यान आरोपी व पोलीस यांच्यात चकमक उडाल्याची घटना घडली आहे. यात कोणती जीवित हानी झाली नाही. परंतु या कारवाईच्या पथकामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही उपस्थित असल्याची चर्चा रंगली आहे.

वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हत्या

सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायिक योगेश जगताप यांच्यावर दोन  अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  सांगवीतील त्या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन हल्ल्याचा कट रचला. घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ‘ योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहागोळया झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागून योगश गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी आणखी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेतली व तेथून पळ काढला.

Cotton Rate : सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही अवस्था, शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Happy Birthday Salman Khan | ‘मैंने प्यार किया’ ते ‘अंतिम’, आजवरच्या कारकिर्दीत सलमान खानमध्ये झाले अनेक बदल!

नितेश राणे का उसमे कोई भी योगदान नही है, सिंधुदुर्गातल्या राड्यावर राणेंचं वक्व्य, नितेश अज्ञातवासात?

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू