AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 28, 2021 | 2:52 PM
Share

पुणे : गांजा बाळगल्याप्रकरणी पुण्यातील महाळुंगे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तात्या मदन काळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

गांजा बाळगल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

सापळा रचून कारवाई

कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ तात्या मदन काळे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी तात्या काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

एक लाख 69 हजारांचा मुद्देमाल

आरोपीकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपुरात कारच्या सीटखालून गांजा तस्करी

नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पकडलं होतं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता. 35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

वाशिममध्ये घरातून गांजा जप्त

वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

Heennaa Panchaal | इगतपुरी रेव्ह पार्टी, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक

(Pune Mahalunge Police detained 8 kg Cannabis)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ