AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्याजाच्या पैशातून वादावादी, कर्जदारांकडून तरुणाची हत्या, पुरावे नसताना पोलिसांनी तिघांना पकडलं

राजस्थानातील झालावाडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. मृतदेहाचा गळाही धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. राधेश्याम डांगी असे मृताचे नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवासी होता

व्याजाच्या पैशातून वादावादी, कर्जदारांकडून तरुणाची हत्या, पुरावे नसताना पोलिसांनी तिघांना पकडलं
राजस्थानमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 05, 2022 | 1:49 PM
Share

जयपूर : प्राथमिक तपासात एकही पुरावा दिसत नसताना पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. राजस्थानातील झालावाड (Rajasthan Crime) जिल्ह्यातील सुनेल भागात पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. दूबलिया-रायपूर मार्गावर एका व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण तिघा आरोपींना अटक केली आहे. कर्जावर घेतलेल्या रकमेच्या व्याजावरुन झालेल्या वादातून (Interest on Loan) ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

32 वर्षीय दुर्गाप्रसाद उर्फ ​​दुर्गेश आणि 20 वर्षीय सुनील यांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी सुनेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबलिया परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. मृतदेहाचा गळाही धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. राधेश्याम डांगी असे मृताचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सोय कलान पोलीस स्टेशन क्षेत्रातील लुहरिया गावचा रहिवासी आहे.

व्याजाच्या पैशावरुन वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राधेश्याम हा व्याजावर पैसे द्यायचा. त्याने आरोपी दुर्गाशंकर आणि सुनील यांना व्याजावर पैसेही दिले होते. जास्त व्याजामुळे दोघांवर जास्त कर्ज झाले, आणि ते पैसे फेडू शकले नाहीत. या कारणावरून तिघांचा वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी कट रचून राधेश्यामला निर्जनस्थळी नेले आणि धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याचा खून केला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या :

नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...