AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, मुळशीमध्ये तीन ठिकाणी गोळीबार

Sharad Mohol Murder Case Update : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येमध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली असून नवीन माहिती समोर आली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, मुळशीमध्ये तीन ठिकाणी गोळीबार
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 11, 2024 | 1:05 PM
Share

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला कोथरूडमधील सुतारदरा येथील राहत्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर गोळ्या घातल्या होत्या.  दुपारी दीड वाजता हा गोळीबार झालेला, शरद मोहोळचा जागेवरच मृत्यु झाला होता. आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं. एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. अशातच या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, नामदेव कानगुडे, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिसांना सर्वांना समोरा-समोर बसवत चौकशी केल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणात आणकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धनंजय वटकर (रा. कराड) आणि सतीश शेडगे (रा. मुळशी) यांनी पिस्तुल पुरवल्याची माहिती आहे.

शरद मोहोळ याला कट रचून संपवल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, आरोपी साहिल याने मुळशीमध्ये तीन ठिकाणी पिस्तुल चालवण्याचा सराव केला होता. त्यासोबतच याआधीसुद्धा शरद मोहोळ याला एकट्याता मारण्याचा प्रयत्न झाल्याचं समजत आहे. मात्र त्यावेळी आरोपींचा हा प्रयत्न फसलेला. मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळचा विश्वास जिंकला होता, कारण मोहोळला थोडीफारही कल्पना आली नाही. मुन्ना पोळेकर हा त्याची सावली नाही तर काळ बनून फिरत आहे.

या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता आहे. नामदेव कानगुडे  साहिलचा म्हणजेच मुन्नाच्या मामाला सुत्रधार म्हटलं  जात असलं तरी खरा मास्टरमाईंड आणखी दुसराच कोणीतरी  असल्याची शक्यता  वाटत आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीत 7 दिवसांची वाढ केली असून आणखी कोणते नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला