Crazy Boyfriend: प्रेयसीला एक्सबॉयफ्रेंडची भीती, दुसऱ्यासोबत लग्न ठरलं, त्यानंतर प्रेयसीने थेट…

प्रेयसीला सनकी एक्सबॉयफ्रेंडची इतकी भीती की...

Crazy Boyfriend: प्रेयसीला एक्सबॉयफ्रेंडची भीती, दुसऱ्यासोबत लग्न ठरलं, त्यानंतर प्रेयसीने थेट...
भावजीची बहिणीला माहेरी येऊन बेदम मारहाण
| Updated on: Dec 21, 2022 | 5:45 PM

मध्यप्रदेश : अनेक मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे घरचे लग्नासाठी परवानगी देत नाहीत. त्यानंतर त्या बॉयफ्रेंडला (Boyfriend) इतक्या घाबरत असतात की, लग्नात येऊन त्याने गोंधळ घातला तर, काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो. मध्यप्रदेशात (MP) एक अशी घटना उघडकीस आली आहे, की मुलीने लग्न दुसऱ्या मुलाबरोबर ठरल्यानंतर एक्सबॉयफ्रेंडच्या भीतीने पोलिस स्टेशनमध्ये (Police) तक्रार दाखल केली आहे. सनकी एक्सबॉयफ्रेंडची तिला इतकी भीती आहे, की तो लग्नात येऊन कधीही राडा घालू शकतो असं तिचं म्हणणं आहे.

यापुर्वी सुद्धा तरुणीने तिच्या एक्सबॉयफ्रेंडवरती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या तरुणीचं लग्न होणार आहे, तो लग्नात येऊन गोंधळ घालू शकतो असं तरुणीला वाटतं असल्यामुळे तिने तक्रार दाखल केली आहे.

एक्सबॉयफ्रेंडने गोंधळ घातल्यानंतर तरुणीला लग्न तुटण्याची भीती वाटतं आहे. त्यामुळे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भंवरकुआं या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तरुणाच्या वडिलांच्याविरोधात सुद्धा त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

पंधरा दिवसांनी तरुणीचं लग्न होणार आहे. मुलीचं लग्न ठरल्याचं त्याला माहित झाल्यापासून तो तरुणीचा सतत पाठलाग करीत आहे. त्याचबरोबर घराच्या आसपास सारखा फिरत असल्यामुळे तरुणीने तक्रार दाखल केली आहे.

प्रेयसीने याच्या आगोदर तीनवेळा तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. तरुणीच्या लग्न होईपर्यंत तरुणाला पोलिस ताब्यात ठेवण्याची शक्यता आहे.