शिक्षिका असलेल्या पत्नीचा सेक्स लाइफ बद्दल धक्कादायक खुलासा, अखेर पोलिसात जावं लागलं

दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये तिचं लग्न एका दातांच्या डॉक्टर बरोबर झालं. अन्य मुलींप्रमाणे तिने सुद्धा डोळ्यात रोमान्स आणि सुखा संसाराची स्वप्न रंगवलेली होती. पण तिला जे समजलं ते धक्कादायक होतं.

शिक्षिका असलेल्या पत्नीचा सेक्स लाइफ बद्दल धक्कादायक खुलासा, अखेर पोलिसात जावं लागलं
marital fraud
| Updated on: Jan 07, 2026 | 4:19 PM

एका महिलेने तिचा डॉक्टर पती आणि सासऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नवरा नपुंसक असल्याचं तिने म्हटलं आहे. लग्नानंतर दोन महिन्यात तो एकदाही संबंध बनवू शकलेला नाही. इतकं की त्याला नुसतं सुहागरात या शब्दाची सुद्धा भिती वाटते. आरोपी नवरा आणि त्याच्या वडिलांनी एक बनावट फेसबुक आयडी बनवून त्यावरुन माझ्याबद्दल आणि माझ्या बहि‍णींबद्दल अश्लील टिप्पणी केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधील हे प्रकरण आहे.

पीडितेच्या तक्रारीवरुन गोरखपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे. पीडितेने ती एका इंटर कॉलेजमध्ये प्रवक्ता असल्याचं सांगितलं. दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये तिचं लग्न गोरखनाथ पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका दातांच्या डॉक्टर बरोबर झालं. आरोपी पती आणि त्याच्या पित्याने सत्य लपवून लग्न केलं. पण सुहागरातच्यावेळी पतीची पोलखोल झाली. पहिल्या रात्री खोलीत ती पतीची वाट पाहत होती. पण त्या दिवशी काहीतरी कारण सांगून संबंध ठेवायचं टाळलं.

प्रत्येकवेळी तो लांब पळून जायचा

पीडितेने सांगितलं की, त्यानंतर 20 दिवस ती सासरी होती. रोज रात्री ती पतीच्या जवळ जायची पण प्रत्येकवेळी तो लांब पळून जायचा. अखेर एकेदिवशी तिने पतीला पळण्याच्या कारणांबद्दल सरळ विचारलं. त्यावर आधी त्याने इथली-तिथली उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीत नपुंसक असल्याचं मान्य केलं. तो लैंगिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नव्हता. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने हा सगळा प्रकार माहेरच्यांना सांगितला. नंतर ती माहेरी निघून आली.

वेगवेगळ्या नंबरवरुन तिला घाणेरडे मेसेजेस

पीडितेने पोलिसांना तक्रारीत सांगितलं की, 1 जानेवारीला तिच्या बहिणीने फोन केलेला. फेसबुकवर कोणीतरी तुझ्याबद्दल अश्लील बोलण्याचा प्रयत्न करतय असं सांगितलं. त्या आयडीवरुन फक्त तिच्याबद्दलच नाही, तर तिच्या बहिणीबद्दल अश्लील बोललं गेलेलं. चौकशी केल्यावर समजलं की कृती अजून कोणाची नसून तिचा पती आणि सासऱ्याची आहे. इतकचं नाही, आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरुन तिला घाणेरडे मेसेजेस पाठवले होते. गोरखनाथ पोलीस स्टेशनचे प्रमुख शशी भूषण राय यांच्यानुसार, आरोपी डॉक्टर आणि त्याच्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.