AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने इराणच्या डोक्यात ट्यूब पेटवली, सांगितला मास्टर प्लॅन, आता एकही गोळी न चालवता होणार अमेरिका आणि इस्त्रायलाच पराभव?

युद्धाच्या आघाडीवर सध्या तरी इराण एकटं पडल्याचं दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायला अनेक देशांनी थेट पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र आता दुसरीकडे चीन इराणच्या मदतीला धावून आल्याचं पहायला मिळत आहे.

चीनने इराणच्या डोक्यात ट्यूब पेटवली, सांगितला मास्टर प्लॅन, आता एकही गोळी न चालवता होणार अमेरिका आणि इस्त्रायलाच पराभव?
xi jinpingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 8:36 PM
Share

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण युद्धाच्या आघाडीवर एकटं पडलं आहे. अमेरिका आणि इस्रायला इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांच्यासह आखाती देशांचा देखील पाठिंबा मिळाला आहे. मात्र इराणला अजून कोणत्याही देशानं थेट पाठिंबा जाहीर केलेला नाही. चीन आणि रशिया हे इराणचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, मात्र त्यांनी देखील केवळ फक्त अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा निषेधच केला आहे. दरम्यान इराणने केवळ अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनाच लक्ष्य केलं नाही. तर सौदी, कतार, बहरीन सारख्या आखाती देशांवर देखील इराणने जोरदार हल्ले केले आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

ते म्हणजे सध्या युद्धाचं तंत्र पूर्णपणे बदलले आहे, सध्याची युद्धे ही केवळ शास्त्रास्त्रांच्या जोरावर नाहीतर बुद्धीच्या जोरावर लढवली जात आहेत. एका चीनी प्राध्यापकानं युद्धासंदर्भात आता इराणला एक सल्ला दिला आहे. इराणला जर आपल्या शत्रू राष्ट्रांना पराभूत करायचं असेल तर एकही गोळी चालवायची गरज नाही. इराण फक्त आपल्या एका चालीद्वारे एकही गोळी न चालवता अमेरिका आणि इस्रायला गुडघे टेकवायला भाग पाडू शकतो, असं या चीनी प्राध्यापकाने म्हटलं आहे. ही रणनीती कोणत्याही मिसाई हल्ल्यापेक्षाही अधिक भयानक असेल असंही या प्राध्यापकाने म्हटलं आहे.

आपल्या प्लॅन बद्दल बोलताना या चीनी प्राध्यापकानं म्हटलं आहे की, आखाती देशांची सर्वात मोठी कमजोरी काय असेल तरी ती म्हणजे पाणी. या देशांमध्ये नौसर्गिक पाण्याचे साठे जवळपास नाहीतच, जे आहेत ते खूप थोडे आहेत. हे सर्व देश समुद्राचं पाणी गोड करून त्याचा पिण्यासाठी वापर करतात. या देशातील पिण्याचं जवळपास 60 टक्के पाणी हे समृद्राच्या पाण्यात प्रक्रिया करून तयार केलं जातं. आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी हे देश मोठ-मोठ्या मशनरी आणि प्लांटवर अवलंबून आहेत. जर इराणने या प्लांटला लक्ष केलं तर या देशांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, पाण्यासाठी या देशांची आपसात लढाई सुरू होईल. इराणने फक्त आपल्या सुसाईड ड्रोनद्वारे या प्लांटवर हल्ला करण्याची गरज आहे, असं या चीनी प्राध्यापकाने म्हटलं आहे. दरम्यान जर या देशांवर पाण्याचं संकट ओढावलं तर आपोआपच या देशांकडून अमेरिका आणि इस्त्रायला होणारी मदत देखील बंद होऊ शकते, असं या प्राध्यापकाने म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...