AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : ‘मळेगाव पोलखोल’या फेसबुक अकाऊंटमुळे संपुर्ण गाव वैतागले; बार्शीतील महिलांनी घेतली पोलीस अधिक्षकांची घेतली भेट

संबंधित फेसबूक पेजचा आधार घेऊन गावातील प्रतिष्ठित महिला आणि मुलींची बदनामी केली जात आहे. त्याचबरोबर गावात महिला संरपंच आहेत. त्यांच्या विरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे.

Solapur : 'मळेगाव पोलखोल'या फेसबुक अकाऊंटमुळे संपुर्ण गाव वैतागले; बार्शीतील महिलांनी घेतली पोलीस अधिक्षकांची घेतली भेट
'मळेगाव पोलखोल'या फेसबुक अकाऊंटमुळे संपुर्ण गाव वैतागले; बार्शीतील महिलांनी घेतली पोलीस अधिक्षकांची घेतली भेट Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 29, 2022 | 2:46 PM
Share

बार्शी – तालुक्यातील ‘मळेगाव पोलखोल’ या फेसबूक पेजमुळे (Facebook Page) संपूर्ण गाव वैतागल्याची घटना समोर आली आहे. या फेसबूक पेजवरुन महिला तसेच गावातील प्रतिष्ठित पुरुषांची बदनामी केली जात असल्याचा आरोप मळेगाव ग्रामस्थांनी केलाय. याबाबत जवळपास पन्नासहून अधिक महिलांनी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे तक्रार केली आहे. मळेगाव पोलखोल (Malegaon Polkhol) या फेसबुक पेजवरुन गावातील महिलांची, तरुणींची बदनामी केली जात आहे. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे. यामुळे गावातील महिलांचे आयुष्य उध्द्वस्त होत आहे. त्यांचे संसार मोडले जात आहे. नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे. अशा विविध मागण्या घेऊन मळेगाव येथील महिलांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswini Satpute) यांना निवेदन दिले. हे सर्व ज्या मळेगाव पोलखोल फेसबुक पेजवरुन होत आहे. त्या फेसबूक अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना जेरबंद करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे महिलांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावातील महिलांना आधार दिला

सोशल मीडियावर अनेर गोष्टी व्हायरल केल्या जातात. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून मळेगाव पोलखोल या फेसबूक पेजवरून चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोप महिलांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. जी व्यक्ती फेसबूक पेज हॅंडल करीत आहे. त्यांनी इतक्या आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या आहेत, की गावातील लोक प्रचंड संतापले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावातील महिलांना आधार दिला असून लवकरचं संबंधित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

आत्तापर्यंत संपुर्ण गावाचा विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

संबंधित फेसबूक पेजचा आधार घेऊन गावातील प्रतिष्ठित महिला आणि मुलींची बदनामी केली जात आहे. त्याचबरोबर गावात महिला संरपंच आहेत. त्यांच्या विरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. फेसबूकच्या पोस्टमुळे अनेक महिलांचे संसार मोडले जाण्याची शक्यता तक्रारी महिलांनी लिहिली आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा