Kalyan Crime : भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने सोसायटीत घुसायचा, मग चोरी करुन पसार व्हायचा !

कल्याणमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Kalyan Crime : भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने सोसायटीत घुसायचा, मग चोरी करुन पसार व्हायचा !
कल्याणमध्ये दिवसाढवळ्या चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 3:07 PM

कल्याण / 31 जुलै 2023 :

कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. चोरटेही चोरी करण्यासाठी विविध फंडे वापरत आहेत. अशीच एक घटना कल्याण पश्चिमेत उघडकीस आली आहे. भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने आरोपी सोसायट्यांमध्ये घुसायचा आणि सोसायटीतील लोखंडी सामान घेऊन पसार व्हायचा. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि चोरट्याची पोलखोल झाली. भरदिवसा होत असलेल्या या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते. याप्रकरणी खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भंगारवाल्याच्या वेशात फिरायचा आणि चोरी करुन पसार व्हायचा

सदर चोरटा परिसरात भंगारवाल्याच्या वेशात फिरायचा. भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने सोसायट्यांमध्ये घुसायचा. दुपारच्या वेळी सोसायट्यांमधील शांततेचा फायदा घेत सोसायटीतील भंगार चोरुन पसार व्हायचा. कल्याण बिर्ला कॉलेज परिसरातील जितेश सोसायटीमध्ये सोसायटीत शांतता असल्याचा फायदा घेत एक भंगारवाला सोसायटीत शिरला. आधी भंगार बाटलीवाले असा ओरडत पूर्ण सोसायटीमध्ये रेखी केली. त्यानंतर सोसायटीत असलेले जिमच्या साहित्यासह इतर लोखंडी वस्तू लंपास केल्या.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीमुळे चोरट्याचे बिंग फुटले

सोसायटीतील साहित्या गायब झाल्याचे लक्षात येताच सोसाटीवाल्यांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरट्याचे बिंग फुटले. यानंतर सीसीटीव्ही फुटेजसह सोसायटीतील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आणि आरोपींची हिंमत पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Non Stop LIVE Update
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.