50 हजारांसाठी 3 महिन्यांचं बाळ विकलं, नंतर अपहरण झाल्याचा बनाव, विकृत आईची विचित्र करामत

बाळाला विकल्यानंतर तिने मुलाचं अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी अवघ्या एक तासात घटनेचा उलगडा केला(three month old child sold by mother for 50 thousand rupees).

50 हजारांसाठी 3 महिन्यांचं बाळ विकलं, नंतर अपहरण झाल्याचा बनाव, विकृत आईची विचित्र करामत
सांकेतिक प्रतिमा
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 3:30 PM

लखनऊ : घरची परिस्थिती कितीही नाजूक किंवा बेताची असली तरी आई-वडील आपल्या मुलांसाठी झठतात. त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करतात. पैशांअभावी पालकांना अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. ते तडजोड करतात आणि आपल्या मुलांना हव्या त्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने पैशांच्या लालसेपोठी तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बाळाला विकल्यानंतर तिने मुलाचं अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी अवघ्या एक तासात घटनेचा उलगडा केला(three month old child sold by mother for 50 thousand rupees).

बाळ सापडलं नाही तर आत्महत्या करेन, मुलाचा वडील रडू लागला

गोरखपूरच्या अलाहीबाग भागात संबंधित घटना घडली. सलमा खातून नावाच्या महिलेने अवघ्या 50 हजार रुपयांसाठी आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं. त्यानंतर तिने मुलाचं अपहरण झाल्याचं पोलीस आणि तिच्या पतीला सांगितलं. मुलाचा वडील मात्र बाळासाठी रडत होता. मुलगा सापडला नाही तर आत्महत्या करेन, असं मुलाचा वडील म्हणाला होता. त्यामुळे सलमाने बाळाचं अपहरण झाल्याची खोटी माहिती पोलिसांना आणि पतीला सांगितली (three month old child sold by mother for 50 thousand rupees).

महिलेने पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

“मी मुलाला कडेवर घेऊन शहनाई मॅरेज हॉलजवळ रस्त्याने चालत होती. त्यावेळी अचानक तिथे एक चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून एक लाल साडी नेसलेली महिला बाहेर आली. तिने माझ्या हातून बाळाला खेचलं. त्यानंतर ती गाडीत बसली आणि गाडीने पळून गेली”, असं महिलेने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांना तपास कसा लावला?

महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस कामाला लागले. पोलिसांनी अवघ्या एक तासात घटनेचा उलगडा केला. त्यासाठी त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. मात्र, तशी काहीच घटना सीसीटीव्हीत दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी सलमाची चौकशी केली. यावेळी सलमाने पोलिसांना खरं सांगितलं. पोलिसांनी सलमा आणि बाळ विकत घेणाऱ्या दोघी महिलांना अटक केली. त्यानंतर दोघी महिलांना जामीनावर सोडलं. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिला असं वागूच कसं शकते? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.

सलमाचं म्हणणं ऐकून पोलीसही चक्रावले

सलमा हिला 4 मुलं आहेत. त्यामुळे तिने सर्वात लहान चौथ्या नंबरचा मुलगा विकण्याचं ठरवलं. आणखी मुलगा हवा असेल तेव्हा आणखी एका मुलाला जन्म देऊ शकतो, असा विचार तिने केला होता. हे सर्व तिने पोलिसांना सांगितलं. या सगळ्या गोष्टी ऐकून पोलीसही चक्रावले.

संबंधित बातम्या :

चार पुरुष आणि एक महिला गाडीतून उतरले, मंदिराजवळ बाळाला सोडून सगळे पसार

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.