रुम साफ करण्याचे हजार रुपये देतो सांगत हॉटेलमध्ये नेलं, नंतर सहा नराधमांकडून संतापजनक कृत्य

राजस्थानच्या भीलवाडा शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. भीलवाड्यातील एका हॉटेलमध्ये 28 वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

रुम साफ करण्याचे हजार रुपये देतो सांगत हॉटेलमध्ये नेलं, नंतर सहा नराधमांकडून संतापजनक कृत्य
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 3:09 PM

जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या भीलवाडा शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. भीलवाड्यातील एका हॉटेलमध्ये 28 वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचा देखील सहभाग आहे. सहा आरोपींपैकी एक आरोपी हा महिलेला हॉटेलमधील रुम साफ करण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला होता. पण तिथे घेऊन गेल्यानंतर आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांनी महिलेवर अत्याचार केला. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे भीलवाडा शहर हादरलं आहे.

महिलेने तक्रारीत नेमकं काय म्हटलं?

याप्रकरणी पीडितेने भीलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. “पिवळ्या शर्ट परिधान केलेला एक आरोप माझ्याजवळ संध्याकाळच्या सुमारास आला. त्याने हॉटेलमधील रुम साफ करण्याचं काम असल्याचं सांगितलं. त्या कामासाठी 1 एक हजार रुपये दिले जातील, असं त्याने सांगितलं. त्यामुळे मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी तिथे हॉटेलच्या रुममध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी त्या खोलीत आधीच तीन जण दारु पित बसलेली होती”, अशी माहिती पीडितेने आपल्या तक्रारीत दिली.

सहा नराधमांकडून पीडितेवर अत्याचार

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी महिलेला रुममध्ये बघितल्यानंतर त्यांनी जबरदस्ती तिला त्यांच्याजवळ बसवलं. त्यांनी तिला जबरदस्ती दारु पाजण्याचा प्रयत्न केला. महिला त्यांचा प्रतिकार करत होती. पण महिलेची ताकद त्या नराधमांसमोर कमी पडत होती. आरोपींनी महिलेवर एकामागे एक अमानुषपणे अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी हॉटलेचा मालकाचं नाव सांगत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या एका सहकाऱ्याला बोलावलं. त्यानेही महिलेवर अत्याचार केला.

थोड्यावेळाने सहावा आरोपी आला. तो महिलेला फरफटत दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. इतर आरोपींनी त्या खोलीच्या बाहेर टाळा लावला. त्याने देखील पीडितेवर बलात्कार केला. अखेर रात्री उशिरा महिला आरोपींच्या तावडीतून निसटली. महिलेने तातडीने पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार ऐकून घेतल्यानंतर पोलीसही हैराण झाले.

पोलिसांकडून तपास सुरु

महिलेच्या तक्रारीनंतर तिची मेडिकल चाचणी करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात सहाही आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पण पोलिसांनी अद्याप कुणालाही बेड्या ठोकलेल्या नाहीत. पोलीस प्रकरणाता सखोल तपास करत आहेत. संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांकडून सध्या शोध सुरु आहे.

मुंबईतील भयानक साकीनाका बलात्कार प्रकरण

दुसरीकडे मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

माशांना खावू टाकणाऱ्या विद्यार्थिनीचा शेततळ्यात बुडून मृत्यू; नाशिकमधल्या घटनेने हळहळ

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.