AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Woman Killed The Cat : काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू,एका महिलेवर गुन्हा दाखल

काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा (Cat) मृत्यू झाला आहे. ही घटना गोखलेनगर (Gokhalenagar) भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय गाठे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police) या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

Woman Killed The Cat : काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू,एका महिलेवर गुन्हा दाखल
काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा मृत्यूImage Credit source: twitter
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: महेश घोलप | Updated on: Apr 10, 2022 | 7:15 AM
Share

पुणे – काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा (Cat) मृत्यू झाला आहे. ही घटना गोखलेनगर (Gokhalenagar) भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय गाठे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police) या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चतुःशृंगी पोलीसांनी शिल्पा नीलकंठ शिर्के या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गाठे याचे पाळीव मांजर शिल्पा शिर्के यांच्या घरात शिरल्याने त्यांना राग आला होता. त्यामुळे शिल्पा शिर्के यांनी काठीने त्या मांजराला मारहाण केली. या मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला, त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. महाराष्ट्रात प्राण्यांना मारल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात.

नेमकं काय आहे प्रकरण

महाराष्ट्रात प्राणी प्रेम प्रचंड पाहायला मिळतं. तसेच प्राण्यांची एखाद्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारे अनेक नागरिक सुध्दा तुम्हाला आढळतील. पुण्यात घडलेला प्रकार अत्यंत किळसवाणा असल्याचे समोर आले आहे. पाळीव मांजर सारखे घरात येत असल्याने मारहाण केली आणि त्यात मांजराचा मृत्यू झाला अशी मांजर मालकाची तक्रार आहे. परंतु या प्रकरणाची अधिक तपासणी केल्यानंतर नेमका मांजराचा मृत्यू कशामुळे झाला हे सिद्ध होईल. शिल्पा शिर्के यांच्या घरी प्रशांत दत्तात्रय गाठे यांचं पाळीव मांजर वारंवार जात होतं. त्यामुळे शिल्पा यांनी मांजराला क्रूरतेची वागणूक दिली. तसेच त्याला काठीने मारहाण केली आहे. काठीने मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू झाला आहे अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

Pakistan Political Crisis : अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी, शहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा

Kolhapur By Election : ‘तुमच्यात देण्याची दानत नाही, तुम्ही फक्त घरं भरली’, कोल्हापुरातून फडणवीसांचा हल्लाबोल

Sharad Pawar : पवारांच्या घरावरील राड्यानंतर विश्वास नांगरे पाटलांची मोठी कारवाई, झोन 2 चे DCP योगेश कुमार यांची उचलबांगडी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली