सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत. त्यांच्या हाताची बोटे तुटून बाजूला पडली आहेत.
सुपारी समजून अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी सखाराम देवळी या सावंतवाडी येथील ओटवणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाने सुपारीसदृश्य वस्तू घरात आणली होती. या वस्तूला सुपारी समजून त्यांनी ती अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोलाकार वस्तू फोडताच एका क्षणात मोठा स्फोट झाला. तसेच काही समजायच्या आता त्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या. हाताची बोटे तुटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज
हा प्रकार समजताच पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे. महिलेने सुपारी म्हणून फोडलेली वस्तू हा गावठी बॉम्ब असावा असा अंदाज बांधला जात आहे. पोलीस याच दिशेने आपला तपास करत आहेत. दरम्यान, हा जर गावठी बॉम्ब असेल तर तो कोणी तयार केला. तसेच लक्ष्मी देवळी यांच्या मुलाकडे तो कसा आला ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन
दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नव्हती. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं होतं.
इतर बातम्या :
शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ
दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार
VIDEO : Mandeep Rode | चंद्रपुरात दारु दुकानांवर कारवाईची मनसेची मागणी@mnsadhikrut pic.twitter.com/22i9KnThFL
Woman loses fingers after explosive blows up while peeling areca nut in sawantwadi sindhudurg