शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील राजीव गांधी परिसरात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. शाहू विद्यालय येथील मैदानात हे भांडण झाले असून यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चोकूने भोसकण्यात आले आहे.

शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ
THANE STUDENT MURDER


ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील राजीव गांधी परिसरात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. शाहू विद्यालय येथील मैदानात हे भांडण झाले असून यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चोकूने भोसकण्यात आले आहे. या गंभीर हल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. तसेच दोघांना अटक करण्यात आले असून मुख्य संशयित फरार झाला आहे.

विद्यार्थ्याच्या पोटात थेट चाकू खुपसण्यात आला

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे इस्टेट येथे राजीव गांधी परिसरात शाहू विद्यालय येथे काही विद्यार्थी जमले होते. त्यांच्यामध्ये अचानकपणे भांडण सुरु झाले. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या या भांडणाचे रुपांतर नंतर थेट हामाणारीमध्ये झाले. हे भांडण नंतर एवढे वाढले की यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पोटात थेट चाकू खुपसण्यात आला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. तर मुख्य आरोपी फरार आहे.

दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार 

या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. मात्र, दोघांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक आणि वागळे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृत्यू झालेला आणि मुख्य आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहेत. दोघांमध्ये भांडण कशामुळे झाले, याचे कारण समजू शकले नाही. मात्र शाळेत खेळण्यावरून आणि आपापसातील वादामुळे ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार

दामदुपटीचे अमिष दाखवून 5 लाख 64 हजार लाटले, तक्रार दाखल होताच पैसे रिफंड, औरंगाबाद सायबर पोलिसांचा दबदबा

सांगलीत परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाच्या फसवणुकीचा प्रयत्न, दोघांना अटक

(fight between two students one murdered with knife in thane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI