AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता समजावतोय, पुढच्या वेळी…’, खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज

बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि महिलांच्या सहकार्याने अवैध दारुविक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून पुन्हा अवैध दारुविक्री सुरु झाली आहे.

'आता समजावतोय, पुढच्या वेळी...', खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज
खेड्या गावातील महिलांचा एल्गार, दारु विक्रेत्यांच्या घरी जावून समज
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 01, 2021 | 11:57 PM
Share

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि महिलांच्या सहकार्याने अवैध दारुविक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून पुन्हा अवैध दारुविक्री सुरु झाली आहे. त्यामुळे गावातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. अवैध दारुविक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी, यासाठी महिलांनी गावातील अवैद्य दारुविक्री करणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना समज दिली आहे. तसेच परत दारुविक्री केल्यास कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे.

दारु विक्रेत्यांकडून नियमांचं उल्लंघन

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात मागील 15 ते 20 वर्षांपासून अवैध दारुविक्री सुरु होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारुविक्री बंद केली होती. अवैध दारुविक्री विरोधात ठरावही घेण्यात आला. पण अवैध दारु विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करुन फक्त काही काळासाठी दारु विक्रीवर प्रतिबंध ठेवत आहेत.

‘दारुविक्री किती वेळा बंद आणि किती वेळा सुरु होत राहील?’

काही दारुडे स्वत:कडे पैसे नसतात तेव्हा आपल्या मुलाबाळांना, पत्नीला तसेच आई-वडिलांना मारहाण करुन घरातील धान्ये आणि भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. तसेच नवीन पिढीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही अवैध दारुविक्री किती वेळा बंद आणि किती वेळा सुरु होत राहील? असा सवाल नांद्राकोळी येथील महिलांनी उपस्थित केला. तसेच अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे.

हेही वाचा :

म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल