AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवर मैत्री, नंतर प्रेम, गर्भवती होताच प्रियकर फरार, प्रेयसी त्याच्या घरी पोहचताच धक्कादायक माहिती उघड

फेसबुकवर मैत्री करुन तरुणाच्या प्रेमात पडणं एका आसामच्या तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे (youth make friendship on Facebook and cheated with girl in Chandigarh)

फेसबुकवर मैत्री, नंतर प्रेम, गर्भवती होताच प्रियकर फरार, प्रेयसी त्याच्या घरी पोहचताच धक्कादायक माहिती उघड
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 2:58 PM
Share

चंदिगड : फेसबुकवर मैत्री करुन तरुणाच्या प्रेमात पडणं एका आसामच्या तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने फेसबुकवर उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील तरुणासोबत मैत्री केली. फेसबुकवर त्यांच्यात बोलणंचालणं वाढलं. त्यातून त्यांच्या मैत्रीचं रुपातर प्रेमात झालं. याच प्रेमात तरुणी गर्भवती झाली. याबाबत तरुणाला माहिती मिळाली तेव्हा तरुण तरुणीला सोडून फरार झाला (youth make friendship on Facebook and cheated with girl in Chandigarh).

नेमकं प्रकरण काय?

आरोपीचं नाव तकमील अहमद असं आहे. खरंतर तो रामपूरच्या डोनकपुरी टांडा गावाचा रहिवासी आहे. पण तो चंदिगड येथे हेअर कटिंगचं काम करायचा. तिथे राहत असताना त्याची फेसबुकवर आसामच्या एका तरुणीसोबत मैत्री झाली. याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्याने त्या तरुणीला आसाममधून चंदिगडला बोलावलं. दोघं एकत्र राहू लागले. त्यांनी लग्न केलं नाही. पण ते एकत्र राहत होते. याच प्रेमातून तरुणी गर्भवती झाली. तरुणीने अहमदला याबाबत माहिती दिली (youth make friendship on Facebook and cheated with girl in Chandigarh).

पीडित तरुणी आसामला जाताच तरुणही चंदिगडमधून फरार

तकमील अहमदने प्रेयसीला प्रसुतीसाठी आसामला जाण्यास सांगितलं. त्यानुसार तरुणी आसामला गेली. पण त्यानंतर अहमद चंदिगडला राहिला नाही. तो तरुणीला न सांगता पुन्हा त्याच्या रामपूर येथील गावात आला. त्याने आपला फोन बंद केला. तरुणीने अहमदला फोन करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आरोपीच्या घरी पोहोचल्यावर धक्कादायक माहिती उघड

अखेर काही महिन्यांनी महिला चंदिगडला आली. तिथे तिला माहिती पडलं की, तिचा प्रियकर तिथून फरार झाला आहे. यानंतर पीडित तरुणी पोलीस ठाण्यात गेली. त्यानंतर वन स्टॉप सेंटरच्या मदतीने तरुणी आपल्या सहा महिन्यांच्या बाळासोबत आरोपीच्या घरी म्हणजे उत्तर प्रदेशात रामपूर येथील गावात पोहोचली.

तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली तेव्हा ती थक्क होऊन गेली. तिथे तिला जी काही माहिती मिळाली त्याने तिला मोठा धक्का बसला. ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती त्याचं आधीच एका महिलेसोबत लग्न झालेले होतं. याशिवाय त्याला पहिल्या पत्नीकडून दोन मुलं होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तरुणीने मोठा आकाडतांडव केला. गावातील नागरिकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला.

आरोपी दोघांसोबत राहण्यास तयार

दुसरीकडे आरोपी प्रियकराने देखील आपली भूमिका मांडली आहे. चंदिगडमध्ये व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे आपण गावी आलो, असं स्पष्टीकरण त्याने दिलं. तसेच तो पहिल्या पत्नीसह पीडित तरुणीसोबत राहण्यास तयार आहे, अशी भूमिका त्याने मांडली आहे. मात्र, त्याची पहिली पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार नाही, अशी देखील माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा : सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.