एमजीएम कॉलेजमधील आकांक्षाच्या मारेकऱ्याला नेमकं कसं पकडलं?

औरंगाबाद: औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालं. खून केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या मजुराने हत्या केली असल्याचे निष्पन्न झालं आहे. एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या दुधनी नगर येथील …

, एमजीएम कॉलेजमधील आकांक्षाच्या मारेकऱ्याला नेमकं कसं पकडलं?

औरंगाबाद: औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालं. खून केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या मजुराने हत्या केली असल्याचे निष्पन्न झालं आहे.

एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या दुधनी नगर येथील एका मजुराला अटक केली आहे. राहुल शर्मा असे आरोपीचे नाव असून तो 10 डिसेंबरच्या रात्री 9.30 वाजताच वसतिगृहाच्या छतावर जाऊन लपला होता. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आकांक्षाच्या खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरला. यावेळी त्याची आकांक्षासोबत झटापट झाली, तिची सोनसोखळी चोरत त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिचा तोंड आणि गळा दाबून खून केला. नंतर रात्री 3 वाजता वस्तीगृहातून निघून सीसीटीव्हीपासून लपत आडमार्गाने परिसराबाहेर पडला.

रात्री अचानक नऊ वाजता रूम वरून गेलेला शर्मा त्याच्या रूमवर पहाटे तीन नंतर पोहोचला. लागलीच त्याने चार मजुरांना सोबत घेत, उत्तर प्रदेशात गावाकडे आईला भेटण्यासाठी जात असल्याचे रूममधील सोबत्यांना सांगितले. यावरून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान,पोलिसांनी सर्व मजुरांची यादी करून तपास सुरू केला. पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठून शर्माला दुधनी येथून मुंबईला रेल्वेने पळून जात असताना कटनी रेल्वे स्टेशन ते जबलपूर दरम्यान ताब्यात घेतले.

आरोपी अटक असले तरी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. एमजीएम महाविद्यालयातील सुरक्षा यंत्रणा सांभाळणार्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

कुठलाही साक्षी पुरावा नसताना सिडको पोलिसांनी केलेला तपास कौतुकास्पद आहे. अटक केलेल्या आरोपीसोबत अन्य कोणी आरोपी आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र या घटनेनंतर बाहेरील शहरातून येणाऱ्या मुली मोठ्या शहरांमध्ये सुरक्षित आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *