अनैतिक संबंधातून तिघी मायलेकींची हत्या, बुलडाणा हादरलं!

मुलींच्या अनैतिक संबंधातून बुलडाण्यातील पिंपळखुटा गावात तिघी मायलेकींची हत्या झाल्याची चर्चा आहे. हत्ये प्रकरणी एका आरोपीला अटक झाली आहे

अनैतिक संबंधातून तिघी मायलेकींची हत्या, बुलडाणा हादरलं!

बुलडाणा : अनैतिक संबंधातून झालेल्या तीन महिलांच्या हत्याकांडाने बुलडाणा हादरले आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीसह तिची बहीण आणि आईची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दादाराव म्हैसागरला अटक केली. आरोपीने तिन्ही महिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. (Buldana shocked with Triple Murder Mother killed with two daughters in extra marital affair)

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील 55 वर्षीय सुमन मालठाणे पती आणि दोन मुलींसह पिंपळखुटा गावात राहत होत्या. त्यांची मोठी मुलगी राधा पतीच्या निधनानंतर गेल्या आठ वर्षांपासून माहेरी राहत होती. तर लहान मुलगी शारदाही घटस्फोट झाल्यामुळे आईकडेच राहायला आली होती.

सुमनबाई आणि त्यांच्या दोन मुली बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून बेपत्ता होत्या. त्यांची शोधाशोध सुरु झाली. सुमनबाई यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पिंपळखुटा शिवारातील एका शेतातील हौदात आढळून आला. त्यांच्या दोन मुलीही बेपत्ता असल्याने पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने या तिन्ही मायलेकींना जीवे मारल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. मुलींच्या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावंडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी

रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू 

(Buldana shocked with Triple Murder Mother killed with two daughters in extra marital affair)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *