जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्यावर गोळीबार, 10 गोळ्या झाडून शरिराची चाळण

हरियाणातील फरिदाबादमध्ये काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली आहे.  विकास चौधरी यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या.

जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्यावर गोळीबार, 10 गोळ्या झाडून शरिराची चाळण

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादमध्ये काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली आहे.  विकास चौधरी यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे विकास चौधरी यांच्या शरिराची अक्षरश: चाळण झाली. त्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे हरियाणातील फरिदाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हल्लेखोरांनी विकास चौधरींवर गोळीबार केला. विकास चौधरी हे आपल्या गाडीतून जिमला निघाले होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज जमा करत असून, तपासाची चक्रं फिरवली आहेत.

हा सर्व थरार सकाळी 9 वाजता घडला. विकास चौधरी हे हुडा मार्केट परिसरातील जिममध्ये निघाले होते. तिथे पोहोचल्यावर ते गाडीतून उतरताच हल्लेखोरांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यांच्यावर जवळपास 10 गोळ्या झाडल्या.

विकास यांच्या मानेवर, डोक्यावर आणि छातीत गोळ्या लागल्या. तर चार गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचेवर धडकल्या.

 कोण आहेत विकास चौधरी?

विकास चौधरी हे हरियाणा काँग्रेसचे प्रवक्ते होते.

काही वर्षांपूर्वीच ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोक दलाने तिकीट न दिल्याने ते काँग्रेसमध्ये आले होते.

येत्या निवडणुकीत विकास चौधरी फरिदाबादमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *