पोटात 10 कोटींचे ड्रग्ज लपवले, 10 डझन केळी खायला देऊन ड्रग्ज कॅप्सूल बाहेर

राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्कर करणाऱ्या टोळीचा (Drugs smuggler Afghanistan gang delhi) पर्दाफाश करण्यात आला.

पोटात 10 कोटींचे ड्रग्ज लपवले, 10 डझन केळी खायला देऊन ड्रग्ज कॅप्सूल बाहेर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्कर करणाऱ्या टोळीचा (Drugs smuggler Afghanistan gang delhi) पर्दाफाश करण्यात आला. ही टोळी अफगाणिस्तानवरुन ड्रग्जची तस्करी करत होती. एका गुप्त माहितीनुसार या सात आरोपींना अटक करणयात आलं आहे. हे सर्व आरोपी ड्रग्जचे कॅप्सूल पोटात (Drugs smuggler Afghanistan gang delhi) लपवून आणत होते. तब्बल 10 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींच्या पोटातून 20 ते 40 कॅप्सूल बाहेर काढले. या आरोपींना ड्रग्ज तस्करीच्या कामासाठी लाखो रुपये दिले जात होते. सात लोकांच्या पोटातून एकूण 117 कॅप्सूल काढण्यात आले आहेत. या सर्व ड्रग्स कॅप्सूलची किंमत 10 कोटींच्या जवळपास असेल.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने या सर्व आरोपींना पकडले. त्यांची संशयी वागणूक दिसल्यामुळे त्यांना थांबवून त्याची चौकशी केली. त्यानंतर सामानातून काही मिळाले नसल्यामुळे त्यांना बॉडी स्कॅनसाठी पाठवले. यानंतर धक्कादायक अशी गोष्ट समोर आली. बॉ़डी स्कॅनच्या मशीनमध्ये आरोपींच्या पोटात ड्रग्ज कॅप्सूल दिसल्या. त्या खाण्यासाठी त्यांना दहा डझन केळी द्याव्या लागल्या.

आरोपींनी कॅप्सूल पोटात घेऊन जाण्याची पद्धती ही सांगितली. मध किंवा एका खास पद्धतीच्या तेलाने या गोळ्या पोटात टाकल्या जातात. तसेच हॉटेलमध्ये जाऊन या कॅप्सूल काढल्या जाणार होत्या. यासाठी हे लोक अफगाणिस्तानवरुन रिकाम्या पोटी आलेले होते.

अटक केलेल्या रहमतुल्लाहच्या पोटातून 28, फैजच्या पोटातून 38, हबीबुल्लाह आणि वदूदच्या पोटातून 15-15, अब्दुल हमीद 18, फजल अहमदकडून 37 आणि नूरजइ कबीरकडून 26 गोळ्या काढल्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *