वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

मानखुर्द येथे एका 44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात (Gangrape in Mankhurd) आला.

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

मुंबई : 44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. (Gangrape in Mankhurd) मानखुर्द परिसरात 24 जून रोजी घडलेला प्रकार काल उघडकीस आला. वाढदिवसाच्या बहाण्याने पीडित महिलेला घरी नेऊन कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून गँगरेप झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली (Gangrape in Mankhurd) आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी लेबर कॅम्प धारावी येथे राहतात.

आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र मुरादच्या मुलाचा वाढदिवस आहे असं खोटे सांगून आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतले. येथे पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला त्रास होऊ लागल्याने महिलेने वैद्यकीय तपासणी केली. यावेळी महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखडल्याचा आणि इतर जखमा, चिमटे काढले असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांना हजर असलेल्या चारही इसमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा दावा पीडित महिलेने केला. त्यानंतर पीडित महिलेने 1 जुलै रोजी चारही आरोपीविरोधात तक्रार मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

संबंधित बातम्या :

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *