बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

कुर्ल्यामध्ये प्रियकरासोबत बेडरुममध्ये असलेल्या मुलीने आई येताच खिडकीतून (Girlfriend-Boyfriend in bedroom) खाली उडी घेतली.

बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

मुंबई : कुर्ल्यामध्ये प्रियकरासोबत बेडरुममध्ये असलेल्या मुलीने आई येताच खिडकीतून (Girlfriend-Boyfriend in bedroom) खाली उडी घेतली. अचानक आई घरी आल्याने तरुणी घाबरली. त्यामुळे तिने खिडकीतून उडी घेतली. यावेळी बेडरुममध्ये तिचा प्रियकरही होता. उडी घेतल्यामुळे तरुणीच्या पायाचे हाड तुटले आहे. ही घटना 6 फेब्रुवारीला (Girlfriend-Boyfriend in bedroom) घडली.

कुर्ला येथील बैल बाजार येथे 17 वर्षीय तरुणी बेडरुममध्ये प्रियकरासोबत होती. जेव्हा तिला समजले आई घरी आली आहे. तेव्हा तिने प्रियकराला पळून जाण्यास सांगितले आणि स्वत: खिडकीतून उडी घेतली. त्यामुळे तिच्या पायाचे हाड तुटले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रियकराला अटक

तरुणीने कुटुंबियांसमोर कबूल केले की बेडरुममध्ये तिचा प्रियकर तिच्यासोबत होता. त्यामुळे ती घाबरली होती. तरुणीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर आम्ही प्रियकरा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, असं पोलिसांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *