AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये “सैराट”, आंतरजातीय लग्न केल्यानं मुलीसह जावयाला पेटवलं

अहमदनगर : पारनेर येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली. पीडित तरुणाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात […]

नगरमध्ये “सैराट”, आंतरजातीय लग्न केल्यानं मुलीसह जावयाला पेटवलं
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

अहमदनगर : पारनेर येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली.

पीडित तरुणाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना अटक केली आहे. यात मुलीच्या मामांचाही समावेश आहे. मुलीचे वडील रामा रामफल भरतीया हे मात्र अद्याप फरार आहेत.

दरम्यान, पीडित मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे आहे, तर मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांनी 6 महिन्यांपूर्वीच आंतरजातीय लग्न केले होते. मात्र, या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. अखेर विरोध डावलून लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलीचे मामा आणि वडिलांनी मुलीसह जावयाला ढवळे वस्ती येथे घरात कोंडले. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. यात दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले. मुलीचा उपचारदरम्यानच मृत्यू झाला. मुलाची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मुलीचे वडील फरार असून मामाला अटक केली आहे. हे सर्व उत्तरप्रदेशचे रहिवासी असून कामानिमित्त अहमदनगरला आले आहेत. मामा सुरेंद्रकुमार बाबूलाल भरतीया आणि घनश्याम मोहन सरोज अटक यांना अटक करण्यात आली आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.