AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुलैमध्ये मैत्री, ऑगस्टमध्ये लव्ह मॅरेज, ऑक्टोबरमध्ये हत्या

इंदौरमध्ये ऑगस्ट महिन्यात लग्न झाल्यानंतर जेमतेम अडीच महिन्यातच अंशु शर्माची पतीने हत्या केली

जुलैमध्ये मैत्री, ऑगस्टमध्ये लव्ह मॅरेज, ऑक्टोबरमध्ये हत्या
| Updated on: Oct 29, 2020 | 7:21 PM
Share

इंदौर : मध्य प्रदेशातील 22 वर्षांच्या युवतीसोबत ‘लव्ह, धोका आणि हत्या‘ असा काहीसा प्रकार घडला आहे. जुलै महिन्यात झालेली ओळख, ऑगस्टमध्ये प्रेम विवाह आणि ऑक्टोबरमध्ये हत्याकांड, असा चार महिन्यांतील चित्तथरारक घटनाक्रम तिच्याबाबत घडला. कुत्रा बांधण्याच्या साखळीने गळा दाबून आणि चाकूने वार करुन अंशु शर्माची हत्या करण्यात आली. (Indore Lady Anshu Sharma Murder Husband allegedly killed her three months after marriage)

इंदौरमध्ये राहणाऱ्या अंशुची ओळख जुलैमध्ये हर्ष शर्माशी झाली, ऑगस्टमध्ये दोघं विवाहबंधनात अडकले, तर ऑक्टोबरमध्ये तिची हत्या झाली. पत्नीवरील संशयातून पती हर्षने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये घडलेल्या घटनेने अंशु आणि हर्ष यांचे निकटवर्तीयही चक्रावले आहेत.

जुलै महिन्यामध्ये अंशु आणि हर्ष यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात व्हायला एका महिन्याचा अवधीही कमी पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानाच दोघांनी लग्न केलं. आठ ऑगस्टला इंदौरमधील आर्य समाज मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर जेमतेम अडीच महिन्यातच म्हणजे 27 ऑक्टोबरला अंशुची हत्या झाली.

लग्नानंतर अंशु आणि हर्ष संयोगितागंज भागातील जावरा कम्पाऊण्डमध्ये राहत होते. कुठल्यातरी कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. मात्र हा वाद इतका टोकाला गेला, की रागाच्या भरात कुत्रा बांधण्याच्या साखळीने गळा हर्षने तिचा दाबल्याचे बोलले जाते. त्यानंतरही तो तिच्यावर चाकूने वार करत राहिला.

इंदौरच्या एमवाय रुग्णालयात पोस्टमॉर्टमनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र लवकरच या हत्याकांडाचा उलगडा होण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Indore Lady Anshu Sharma Murder Husband allegedly killed her three months after marriage)

संबंधित बातम्या :

कल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरी

मुंडके छाटलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अनैतिक संबंधातून हत्या, गंगापूर पोलिसांकडून क्लिष्ट खुनाचा उलगडा

(Indore Lady Anshu Sharma Murder Husband allegedly killed her three months after marriage)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....