AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फर्स्ट क्लासमध्ये दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, तरुणाने सहप्रवाशाचं बोट चावून तोडलं

फर्स्ट क्लासच्या दरवाजात उभं राहण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाने एका प्रवाशाच्या बोटाचा कडकडून चावा घेतला. हा चावा इतका जबरदस्त होता, की बोटाचा एक सेंटीमीटर भाग तुटला

फर्स्ट क्लासमध्ये दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, तरुणाने सहप्रवाशाचं बोट चावून तोडलं
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 22, 2019 | 3:37 PM
Share

मुंबई : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी वादावादी नवीन नाही. मध्य रेल्वेवरील आसनगाव लोकलच्या दरवाजात उभं राहण्यावरुन झालेल्या वादाने कळस गाठला. 25 वर्षीय तरुणाने सहप्रवाशाच्या बोटाचा भाग चावून तोडल्याचा (Man bites fellow commuters’ finger) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रथम दर्जाच्या डब्यात हा प्रकार घडला.

34 वर्षीय महेश पांडुरुंग ढुंबरे यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीचा म्हणजेच पहिल्या बोटाचा एक सेंटीमीटर भाग तुटला आहे. 25 वर्षीय आरोपी आसिफ युसूफ शेखला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ढुंबरे यांना तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली.

घणसोलीमध्ये राहणाऱ्या महेश ढुंबरे यांनी गुरुवारी संध्याकाळी दादर स्टेशनवर लोकल पकडली. आसनगाव फास्टमधील फर्स्ट क्लासच्या डब्यात ते चढले. दोघा इतर प्रवाशांसह ढुंबरे दरवाजात उभे होते. कुर्ला स्टेशनवर आरोपी आसिफ डब्यात चढला. डोअरला उभं राहण्यासाठी आसिफने ढुंबरे यांना ढकलाढकली सुरु केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

वादाला तोंड फुटताच आसिफने ढुंबरे यांना शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर त्यांची कॉलर खेचल्यामुळे शर्टाचं बटणही तुटलं. प्रत्युत्तरादाखल ढुंबरेंनीही आसिफची मान धरली. याच वेळी आसिफने ढुंबरे यांच्या बोटाचा कडकडून चावा (Man bites fellow commuters’ finger) घेतला. हा चावा इतका जबरदस्त होता, की बोटाचा एक सेंटीमीटर भाग तुटला आणि आसिफच्या तोंडात राहिला.

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

ढुंबरे यांच्या तुटलेल्या बोटातून रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली. यानंतरही आसिफ थांबला नाही. त्याने ढुंबरेंना शिवीगाळ करत चालत्या गाडीतून बाहेर फेकून देण्याची धमकी दिली. सहप्रवाशांनी भांडण सोडवलं आणि जीआरपींना याबाबत माहिती दिली.

ठाणे स्टेशनवर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आसिफची रेल्वे पोलिसांनी धरपकड केली. त्याच्यावर रेल्वे पोलिसांनी कलम 325 आणि 504 अन्वये कारवाई केली आहे.

दुसरीकडे, महेश ढुंबरे यांना ठाण्यात जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उजव्या हाताच्या तर्जनीचा एक सेंटीमीटर भाग तुटल्यामुळे त्यांच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...